SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रशियाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा शेवटचा व्हिडीओ पाहून व्हाल भावुक..

नवीन शेखरप्पा ज्ञानगौडा.. अवघा 21 वर्षांचा उमदा तरुण.. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील चालगेरीचा रहिवासी.. अभ्यासात एकदम हुशार.. डाॅक्टर होऊन रुग्णसेवा करण्याचं त्याचं स्वप्न होतं.. बारावीला चांगला अभ्यास केला.. तब्बल 97 टक्के मार्क मिळाले.. मात्र, डाॅक्टर होण्यासाठी ते पुरेसे ठरले नाही..

काहीही करुन डाॅक्टरच व्हायचं, असं नवीनचं स्वप्न होतं.. त्यासाठी तो युक्रेनला गेला.. मात्र, आता त्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.. आपल्या आई-वडिलांना, गावाला, देशाला नि मोठ्या स्वप्नांना मागे ठेवून तो मोठ्या प्रवासाला निघून गेलाय.. एका न संपणाऱ्या प्रवासाला..

Advertisement

Advertisement

युक्रेनचा बदला घेण्यासाठी रशियन सैन्याकडून जोरदार हल्ले सुरु आहेत.. युक्रेनमधील खारकीव शहरातील सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यासाठी मंगळवारी (ता. 1) सकाळी रशियन सैनिकांनी ‘एअर स्ट्राईक’ केला. नंतर सर्वसामान्य नागरिकांवरही मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला..

जेवण आणण्यासाठी गेलेल्या नवीनचा एका गोळीने वेध घेतला.. नि त्याला आपला जीव गमवावा लागला. रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यापासूनच त्याच्या घरच्यांची झोप उडाली होती. आपला मुलगा कधी एकदा घरी येतोय, कधी त्याला डोळे भरुन पाहतोय, असे त्यांना झाले होते.. मात्र, अखेर आली, ती त्याच्या मृत्यूची बातमीच..

Advertisement

वडिलांना अश्रू अनावर
नवीनच्या मृत्यूबाबत समजताच, त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.. आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत ते म्हणाले, की “माझ्या मुलाला ‘पीयूसी’मध्ये 97 टक्के गुण मिळाले होते…त्यानंतरही त्याला आपल्या इकडे वैद्यकीय शिक्षणासाठी सीट मिळाली नाही. डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन तो युक्रेनला गेला, पण…”

“आपल्याकडे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा, म्हणजे कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. एका एका सीटसाठी आपल्याकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. त्याच वेळी तिकडे (युक्रेनमध्ये) अगदी कमी खर्चात भारतीय विद्यार्थ्यांना तेच शिक्षण मिळतं..” असंही ते म्हणाले.

Advertisement

नवीनला 97 टक्के गुण मिळूनही भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश न मिळाल्याने त्याच्या वडिलांनी खंत व्यक्त केली. त्याच वेळी त्यांनी एक प्रकारे भारतीय शिक्षण पद्धतीवर बोट ठेवलंय.. भारतातून अनेक विद्यार्थी वैद्यकिय शिक्षणासाठी परदेशात जातात.. युक्रेनसारख्या छोट्या देशात कमी पैशांत शिक्षण होत असेल, तर आपल्याला ते का जमत नाही, असा त्यांचा सवाल आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement