SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. महत्वाचे पत्र व्यवहार होतील. खाण्या-पिण्याची लयलूट राहील. वडिलोपार्जित संपतीची कामे होतील. काहीं जणांना अचानाक राग होईल. आर्थिक आवक चांगली राहील. पोट बिघडण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus): उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मिळेल. अडचणी दूर होतील. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. तुमच्या आवडीचे काम मिळेल. मुलांकडे दुर्लक्ष करु नका. प्रवासात सावधानता बाळगा. मित्रांबरोबर आनंदाचे क्षण घालवू शकता.

मिथुन (Gemini) : कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ कमवाल. मनात काळजीचे विचार राहतील. संयमाचे वागणे आवश्यक आहे. एखाद्या कामात दिरंगाई होईल. आरोग्याची काळजी घ्या. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. मित्र-मैत्रिणींची भेट होईल.

Advertisementकर्क (Cancer) : तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वडीलांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल. कामातील निर्णय योग्य ठरतील. प्रवासाचे योग येतील. सहकारी मदत करतील. नोकरीत प्रगती होईल. थोडी दगदग होईल. एखाद्या व्यवहारात फायदा होईल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह (Leo) : जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. व्यवहार जपून करा. कोणीही अडचण आणणार नाही, याची काळजी घ्या. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. नोकरी आणि व्यवसाय वर्गातील व्यक्तींना नफा होण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo) : सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. प्रवासात दगदग होईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. महत्वाच्या कामात अडचणी येतील. मनासारखे भोजन मिळेल. इतरांशी वाद घालणं टाळा. उच्च पदाधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल.

Advertisement


तुळ (Libra) : नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. कामाची धांदल उडू शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. आरोग्याकडे लक्ष द्या. सरकारी कामात यश मिळेल. मन स्थिर ठेवा. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबावर लक्ष कमी राहील. कामे आटोक्यात येतील. मनातील चिकाटीमुळे आज आपले कार्य चांगले होऊ शकेल.

वृश्‍चिक (Scorpio) : काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. घरी पाहुणे येतील. त्यांच्या सरबराईत वेळ जाईल. अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. ग्रहमानाची अनुकूलता राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

धनु (Sagittarius) : बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मदतीला मागे हटु नका. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मिळकतीच्या तुलनेत खर्च जास्त राहील. नोकरीत मतभेद होतील. गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. आज प्रवास करताना काळजी घ्या.

Advertisementमकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. अति विचार करू नका. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. तरुण तरुणींचा विवाह ठरेल. प्रेमात असलेल्यांना घरी सांगण्यास हरकत नाही. जमीनींच्या व्यवहारात यश मिळेल. प्रत्येक कामात यश मिळेल.

कुंभ (Aquarious) : क्रोधवृत्तीला आवर घालावी. अचानक ताण येईल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कामातील निर्णय योग्य ठरतील. मुलांची काळजी घ्या. तुमचा शब्दाचा मान राखला जाईल. काहींना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. पैसे दिसतील.

मीन (Pisces) : पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. भेटवस्तू मिळतील. लोकांना योग्य सल्ला द्याल. वेळेचा सदूपयोग कराल. लोकांच्या भेटीगाठी होतील. समाजात मान-सन्मान मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आर्थिक लाभ होईल. इतरांशी बोलताना मनावर संयम ठेवा.

Advertisement