SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, एसटीच्या विलिनीकरणाबाबत समितीचा धक्कादायक निर्णय..!

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी 28 ऑक्टोबर 2021 पासून कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून एसटी सेवा बंद असून, सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. संपामुळे एसटीचे तब्बल 1600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे..

एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी कोर्टाच्या आदेशानुसार, सरकारने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने नुकताच त्यांचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. राज्य सरकारकडून हा अहवाल 25 फेब्रुवारीलाच मुंबई हायकोर्टात सादर करणे अपेक्षित होते..

Advertisement

एसटी महामंडळाच्या वकिलांनीही राज्य सरकारकडे अहवालाची मागणी केली होती. मात्र, लगेच हा अहवाल देण्यास सरकारच्या वकिलांनी विरोध केला. एसटी विलीनीकरणाचा अहवाल लगेच जाहीर करता येणार नाही. हा अहवाल प्रतिवाद्यांना देण्याकरिता मंत्रिमंडळाची मंजूरी आवश्यक असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाला दिली.

समितीने दिलेला हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यासाठी राज्य सरकारने 2 आठवड्यांचा अवधी मागवला होता. त्यानुसार, आता या याचिकेवर 11 मार्चला सुनावणी होणार आहे.. मात्र, त्याआधीच एक मोठी बातमी समोर येत आहे… एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला धक्का देणारी ही बातमी आहे..

Advertisement

अहवालात नेमकं काय..?
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (ता. 2) झालेल्या बैठकीत हा अहवाल मांडण्यात आला. “एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करता येणार नाही.. एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणीच व्यावहारिक नाही..” असा निष्कर्ष त्रिसदस्यीय समितीने काढला आहे.. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात येऊ नये.. असा धक्कादायक अभिप्राय त्रिसदस्य समितीने नोंदविला असल्याची माहिती समोर आली आहे..

राज्य एसटी महामंडळातील 93 हजार एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करणे व्यावहारिक नसल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाचा कायदेशीर मार्गही बंद झाला आहे. राज्यात आजही ठिकठिकाणी एसटी कर्मचारी संपावर असून, एसटी कर्मचारी व त्यांच्या संघटना आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement