SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम वरील चित्रपट मोफत पाहता येणार, करावं लागणार फक्त ‘हे’ काम..

आपल्याला ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर एखादा नवीन चित्रपट आणि वेब सिरीज पाहायचा असेल, तर आपण Netflix, Amazon Prime Video, Hotstar, Zee5 सारख्या ॲप्सद्वारे पाहू शकतो. पण या सर्व ॲप्ससाठी आपल्याला सबस्क्रिप्शनची गरज असते पण प्रत्येकाकडे ते असेलच असं नाही. मोबाईलच्या रिचार्जचा खर्च आणि सोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन घेण्यासाठी अमुकतमूक रिचार्ज आलाच.

बेल्जियम मध्ये आता कर्मचार्‍यांना आठवड्यातील फक्त 4 दिवस काम करावे लागणार; भारतातही असे झाले तर तुम्हाला आवडेल का? तुमचे मत मांडा

आज आम्ही तुम्हाला अशा काही ॲप्सबद्दल सांगणार आहोत, की ज्याद्वारे तुम्ही हेच नवीन चित्रपट फ्री मध्ये पाहू शकता. पण तुम्हाला माहीत आहे का ? हे तुम्ही कोणतेही सबस्क्रिप्शन न घेता आणि पैसे खर्च न करता एकापेक्षा एक भारी चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकता? कसं ते वाचा सविस्तर.

Advertisement

1. पॉपकॉर्न टाइम (Popcorn Time): पॉपकॉर्न टाइम हे apk फॉरमॅटमध्ये तुम्हाला डाऊनलोड करून Install करावं लागणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला प्रथम Google वर जाऊन Popcorn Time APK असं टाकून सर्च करावे लागेल. मग ते डाउनलोड करण्याचा पर्याय आल्यावर डाऊनलोड करून तुम्ही सहजपणे फ्री मध्ये चित्रपट आणि वेबसिरीजचा आनंद घेऊ शकता.

2. टोरंटविला (Torrentvilla) – टोरंटविला (Torrentvilla) च्या साहाय्याने तुम्ही अगदी फ्री मध्ये चित्रपट डाऊनलोड करून वाट्टेल तेव्हा पाहू शकता आणि त्यांच्या रेटिंगनुसार आपण कोणत्याही चित्रपटाबद्दल संपूर्ण माहिती घेऊन ठरवून डाऊनलोड करू शकतो. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या Android डिव्हाइसवर हे ॲप घेऊन नवीन चित्रपट पाहू शकता. यात चित्रपटांची यादी तयार करून ती तुमच्या मित्रांसह शेअर करू शकता. Torrentvilla वर, तुम्ही ॲक्शन एडव्हेंचर, सायन्स संबंधित, हॉरर, क्राइम, रोमान्स, कॉमेडी, फँटसी, इतिहास, रहस्य, नाटक, संगीत, युद्ध, कॉमिक सायन्स फिक्शन अशा चित्रपटांच्या विविध कॅटेगरी पाहू शकता.

Advertisement

3.व्हिडियो बडी (VideoBuddy) – अनेक चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही Video Buddy मध्येदेखील ऑनलाईन रेकॉर्डिंग, चित्रपट, संगीत आणि टीव्ही शो पाहू शकता. याच्या मदतीने तुम्ही चित्रपट डाउनलोड करू शकता. डाऊनलोड केलेले ॲपवर ठेवू शकता आणि नंतर ते पाहू शकता. या ॲपवर तुम्ही यूट्यूबचे सर्व व्हिडिओ एचडी फॉरमॅटमध्ये सेव्ह करून डाउनलोड देखील करू शकता.

4. साइबर फ्लिक्स टीवी (Cyberflix Tv) – हाय स्पीड सर्व्हर तुम्हाला या ॲपवर विविध टीव्ही शो आणि चित्रपटांची मेजवानी देईल. अनेक प्रकारातील चित्रपट, टीव्ही शो बघता येईल. याचा मनमुराद आनंद आपल्याला लुटता येईल.

Advertisement

5. Unlock My Tv – शेवटचं ॲप म्हणजे अनलॉक माय टीव्ही ॲप. या ॲपवरही तुम्ही विनामूल्य चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकतो. त्यामुळे अनलॉक माय टीव्ही ॲपवर तुम्ही नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम सारख्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवरील येणारे चित्रपट आणि वेबसिरीज विनामूल्य पाहू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement