SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वीज ग्राहकांसाठी खुशखबर! ‘हे’ केले तर थकित वीजबिलामध्ये मिळणार मोठी सवलत..

राज्यात कोरोना काळात आलेले भरमसाठ बिल (electricity bill) अजूनही राज्यातील लोक भरत आहेत. वीजनिर्मितीसाठी कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे वीजेचं कमी झालेलं उत्पादन, त्यातून लोडशेडींगची भीती आणि वीज बील थकबाकीचा वाढत चाललेला आकडा यामुळे राज्याच्या उर्जा विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

जगातील सर्वात शक्तीशाली सैन्यदल असलेल्या देशाची यादी जाहीर, भारताचा क्रमांक कितवा, वाचा..!

Advertisement

राज्यातील वीज बील ग्राहकांसाठी अशातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यामध्ये प्रामुख्याने जर वीज ग्राहकांनी एकरकमी थकबाकी भरल्यास राज्यातील वीज ग्राहकांना त्यांच्या वीजबिलावरील व्याज आणि विलंब शुल्क हे दोन्ही 100% माफ केले जातील, अशी थकबाकी असणाऱ्या ग्राहकांच्या फायद्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

▪️ दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने ‘विलासराव देशमुख अभय योजना’ ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.

Advertisement

▪️ जर वीज ग्राहकांनी एकरकमी थकबाकी भरली तर सर्व वीज ग्राहकांना व्याज व विलंब शुल्क माफ केले जाणार आहे. मात्र यामध्ये कृषि पंप ग्राहकांना दिलासा देण्यात आलेला नाही.

▪️ या योजनेचा कालावधी 1 मार्च 2022 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत असून ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू असणार आहे.

Advertisement

▪️ थकबाकीदार ग्राहकांना वीज बिलाच्या थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरावी लागेल. उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्के रक्कम माफ केली जाणार आहे.

▪️राज्यातील लघुदाब ग्राहकांची एकरकमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रक्कम माफ केली जाणार आहे, अशी घोषणाही राऊत यांनी केली.

Advertisement

▪️ जर राज्यातील ग्राहकांना या योजनेचा फायदा घेऊन वीजपुरवठा सध्या आहे, त्याच ठिकाणी सुरू करायचा असेल, तर महावितरण वीज पुरवठा सुरू करेल, परंतु जर ग्राहकाला नवीन वीज जोडणी घ्यायची असल्यास नियमानुसार पुन्हा वीजजोडणी शुल्क व अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

दरम्यान मागील काही महिन्यात मीटर बंद असल्यामुळे एकाच वेळी ग्राहकांना भरमसाठ वीजबिले पाठवण्यात आली. त्यामुळे ग्राहकांच्या मनात गोंधळ होता. काही जागी वीज मीटर नसतानाही बिले आली होती ल, यामुळे महावितरणवर अनेक जण नाराज होते त्यामुळे हेलपाटे मारण्याचा त्रासही काही ग्राहकांना झाला. आता कोरोना काळात अनेक वीज ग्राहकांचे वीजबिल थकीत असल्याने सरकारने ही योजना सुरू केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement