SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील 14 जिल्ह्यांतील कोविड निर्बंध शिथील, ठाकरे सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी..!

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे.. दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाली असून, ‘ओमायक्राॅन’चे संकटही दिसत नाही.. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील निर्बंध कमी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ठाकरे सरकारने अखेर राज्यातील निर्बंध कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे..

कोरोनाची स्थिती सुधारत असलेल्या जिल्ह्यांचा समावेश ‘अ’ श्रेणीत, तर उर्वरित जिल्ह्यांचा समावेश ‘ब’ श्रेणीत केला आहे. त्यानुसार ‘अ’ श्रेणीतील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. येत्या 4 मार्चपासून नव्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे..

Advertisement

निर्बंध शिथिल केलेल्या 14 जिल्ह्यांमध्ये 4 मार्चपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळे 100 टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत. मात्र, उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे सर्व 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. राज्य सरकारने निर्बंध शिथील केल्याने महाराष्ट्राची वाटचाल पूर्ण ‘लॉकडाऊनमुक्त’ होण्याकडे असल्याचे दिसते.

‘या’ जिल्ह्यातील निर्बंध शिथील
– मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर
– रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर व कोल्हापूर.

Advertisement

‘अ’ गटात असा झाला समावेश
लसीचा पहिला डोस झालेल्या नागरिकांचं प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त, तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.
– पॉझिटिव्हिटी रेट (दर 100 चाचण्यांपैकी पॉझिटिव्ह सापडण्याचं प्रमाण) 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
– ‘आयसीयू’मधील ‘ऑक्सिजन बेड’ 40 टक्क्यांहून कमी प्रमाणात भरलेले असतील.

कोणते निर्बंध शिथिल..?
– ‘
अ’ श्रेणीतील 14 जिल्ह्यांमध्ये सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम किंवा उत्सवासाठी हॉल किंवा मैदानाच्या 50 टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी दिली आहे. लग्न व अंत्यविधीचाही त्यात समावेश आहे.
– या जिल्ह्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन वर्ग सुरू करता येणार. संबंधित सरकारी विभाग वा स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांनुसार हे वर्ग सुरू करता येतील. अंगणवाडी, शिशू गटांचे वर्गही सुरू करण्यास परवानगी.

Advertisement

या जिल्ह्यांमध्ये ‘होम डिलिव्हरी’ सेवा सुरू करता येणार आहे..
शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृहे, रेस्टॉरंट, बार, क्रीडांगण, जिम, स्पा, स्वीमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्यगृह, पर्यटनस्थळे, मनोरंजन पार्क 100 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी. ‘अ’ गटात नसलेल्या जिल्ह्यांसाठी 50 टक्के क्षमतेची मर्यादा कायम असेल.

जिल्ह्यांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीला परवानगी असेल. पूर्ण लसीकृत नसल्यास ‘निगेटिव्ह आरटीपीसीआर’ अहवाल प्रवासासाठी बंधनकारक असेल.
– खासगी व सरकारी कार्यालयांना पूर्ण क्षमतेनं कामाची परवानगी.
– सर्व प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी 100 टक्के क्षमतेनं कामकाजाची मुभा, इतर जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत असेल.

Advertisement

पूर्ण लसीकरण आवश्यक
दरम्यान, 100 टक्के क्षमतेनं कामकाज करण्यासाठी पूर्ण लसीकरणाची अट कायम आहे. होम डिलीव्हरी करणारे, सार्वजनिक वाहतूक सेवेतील कर्मचारी, मॉल-थिएटर्स-नाट्यगृह-पर्यटनस्थले, रेस्टॉरंट-क्रीडा मैदानांवर येणाऱ्यांसाठी पूर्णपणे लसीकरण झालेले असावे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement