SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: सोनं 6,600 रुपयांनी झालं महाग, वाचा आजचा दर काय..?

सध्या रशिया युक्रेन युद्धाचा (Russia- ukraine conflicts) आज पाचवा दिवस आहे. या सुरू असलेल्या रशिया युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर आंतराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या घडामोडींमुळे सोने-चांदी, खाद्यतेल, क्रूड ऑईल दरात वाढ होत आहे तर दुसरीकडे शेअर बाजारात घसरणीचे सत्र पाहायला मिळत आहे. परिणामी, सोन्याच्या किमती आणि तेलाच्या किंमतीवर याचा जास्त फटका बसत आहे.

तातडीने कीवमधून बाहेर पडा; दूतावासाच्या भारतीयांना सूचना

जगातील अनेक देश रशियावर सातत्याने नवनवीन निर्बंध लादत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. भारतात परिस्थिती पाहता, आज भारतातील सोन्याचे दर पाहता किलोमागे 6,600 रुपयांनी वाढ झालीय. भारतात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,000 रुपये आणि 24 कॅरेटचा 51,280 रुपये आहे.

Advertisement

जाणून घ्या आजचा सोन्याचा दर..

शहर – 22 कॅरेट – 24 कॅरेट

▪️ मुंबई – 47,820 – 52,170
▪️ पुणे – 47,100 – 51,280
▪️ नागपूर – 46,950 – 51,200
▪️ नाशिक – 47,100 – 51,300
▪️ दिल्ली – 47,000 – 51,280
▪️ कोलकत्ता – 47,000 – 51,280
▪️ बॅंगलोर – 47,000 – 51,280
▪️ चेन्नई – 47,820 – 52,170
▪️ अहमदाबाद – 46,900 – 51,430
▪️ लखनऊ – 47,150 – 51,430

Advertisement

तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे भाव आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या भावामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो, हे लक्षात ठेवावे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement