SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रोहित शर्माच्या ट्विटरवरुन विचित्र ट्विटस्..! समोर आले धक्कादायक कारण..!

‘हिटमॅन’ अर्थात भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा.. क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये ‘टीम इंडिया’च्या कॅप्टन पदाची धुरा रोहितवर आल्यापासून भारतीय संघ विजयरथावर स्वार झाला आहे.. आपल्या अनोख्या नेतृत्व शैलीने त्याने अनेकांना प्रभावित केले आहे. सध्या रोहितची अवस्था ‘पांचों उंगलियां घी में..’ अशी आहे..

टीम इंडियाने ‘टी-20 सीरिज’ जिंकल्यानंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कंबर कसली आहे. कसोटी मालिकेला 4 मार्चपासून सुरुवात होत असून, या मालिकेपासून रोहितच्या टेस्ट कॅप्टन्सीच्या इनिंगला सुरुवात होणार आहे. मात्र, त्याआधीच वेगळ्याच कारणांनी रोहित चर्चेत आला आहे.

Advertisement

जगातील सर्वात शक्तीशाली सैन्यदल असलेल्या देशाची यादी जाहीर, भारताचा क्रमांक कितवा, वाचा..!

बिनधास्त स्वभावासाठी रोहित ओळखला जातो.. मात्र, आज (मंगळवारी) सकाळपासूनच रोहितच्या ‘ट्विटर'(Twitter) अकाऊंटवरून विचित्र ट्वीट करण्यात येत होते.. हे ट्विट पाहिल्यावर रोहितच्या फॅन्सनी आश्चर्य व्यक्त केलं.. लेग स्पिनर युझवेंद्र चहल व कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी तर ‘सगळं काही ठीक आहे ना..?’ असं रोहित शर्माला ट्विटरवरच विचारलं.

Advertisement

नेमकं काय घडलं..?
रोहितच्या ‘ट्विटर’ अकाऊंटवरुन गेल्या काही तासांमध्ये 3 ट्विट करण्यात आले. त्यात म्हटलं होतं, की “मला टॉस उडवायला फार आवडतं, जेव्हा तो टॉससाठी उडवलेला कॉईन पोटावर येऊन पडतो..” आणि “क्रिकेट बॉल खाण्यासाठी योग्य असतात, बरोबर ना..” असे ट्विटमध्ये म्हटलं होतं..

Advertisement


दरम्यान, रोहितच्या अकाऊंटवरुन हे ट्विट करण्यात आल्यामुळे नेटीझन्स नि रोहितच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अखेर आता खुद्द ट्विटरनेच रोहितचं अकाऊंट हॅक झाल्याचं मान्य केलं आहे. रोहित ‘आयफोन’द्वारे ट्विट करतो. मात्र, ‘ट्विट डेक’द्वारे हे ट्विट करण्यात आले होते. त्यामुळे रोहितचं अकाऊंट हॅक झाल्याचेच समोर आले. दरम्यान, याबाबत रोहित शर्मा याच्याकडून कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement