SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पीक विमा योजनेबाबत मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.., शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा…!

बळीराजा.. देशाचा पोषणकर्ता.. मात्र, या ‘राजा’चा कायम ‘बळी’ गेलाय.. कधी ‘अस्मानी’, तर कधी ‘सुलतानी’ संकटांनी बळीराजाला कधी सुखी-समाधानी होऊच दिलं नाही.. कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा.. कधी हाता-ताेंडाशी आलेले पीक अवकाळी पाऊस, वादळ-वाऱ्यांनी खाल्ले, तर कधी चांगला माल होऊनही भाव पडलेले..

दुष्काळ, वादळ, अवकाळी पाऊस, पूर, भूस्खलन, गारपीट, रोगाचा प्रादुर्भाव, चक्रीवादळ अशी संकटे तर शेतकऱ्याच्या पाचवीला पूजलेली असतात.. या बळीराजाला नैसर्गिक संकटांपासून सावरण्यासाठी मोदी सरकारने 18 फेब्रुवारी 2016 रोजी एक योजना सुरु केली होती. ‘पंतप्रधान पीक विमा योजना..’, असे या योजनेचे नाव..!

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या महत्वाकांक्षी योजनेत गेल्या 6 वर्षांत तब्बल 36 कोटी शेतकरी जोडले गेले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या बदल्यात या शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई देण्यात आल्याचे आकडेवारी सांगते..

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात विमा कवच मिळते. पेरणीपासून कापणीनंतरच्या संपूर्ण पीक चक्रादरम्यान काही नुकसान झाल्यास, या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.

Advertisement

असे व्हा योजनेत सहभागी…
पंतप्रधान पीकविमा योजनेत सामील होण्यासाठी https://pmfby.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा पीकविमा मोबाईल अॅपचा वापर करू शकता. तसेच बँक किंवा सीएसी (CSC) शाखेला भेट देऊन योजनेत सहभागी होऊ शकता..

आवश्यक कागदपत्रे

Advertisement
  • आधार कार्डची प्रत
  • बँक पासबूकचे पहिले पान
  • जमिनीच्या कागदपत्रांची प्रत
  • राज्य सरकारने अधिसूचित केलेली इतर कागदपत्रे.

‘माझी पॉलिसी, माझ्या हाती’
दरम्यान, ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ आता अधिक देशव्यापी केली जाणार आहे.. त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नुकतीच ‘माझी पॉलिसी, माझ्या हाती’ ही पीक विम्याबाबतची देशव्यापी मोहीम सुरू केली. इंदूरपासून 35 किलो मीटरवरील ‘बुढी बरलाई’ गावात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

पंतप्रधान पीकविमा योजनेचे दस्ताऐवज (पॉलिसी डॉक्युमेंट्स) देशातील ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने ही मोहीम हाती घेतली आहे..

Advertisement

‘माझी पॉलिसी, माझ्या हाती’ ही मोहीम महिनाभर चालणार आहे. त्यात रब्बी हंगाम 2021-22 अंतर्गत विमा उतरवलेल्या सर्व शेतकर्‍यांना त्यांच्या घरी जाऊन पीकविम्याची कागदपत्रे दिली जाणार आहेत. या मोहिमेद्वारे नैसर्गिक शेती, ड्रोन, ई-सॅम्पलिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही परिचय करून दिला जात आहे.

सरकारची धोरणे, जमिनीच्या नोंदी, दावा प्रक्रिया आणि ‘पीएमएफबीवाय’ (PMFBY) अंतर्गत तक्रार निवारण यासंबंधीच्या माहितीबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement