SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हायरल झालेल्या कच्चा बदाम’ गाण्याचा गायक गंभीर जखमी, झालाय मोठा अपघात

सोशल मीडियावर ‘कच्चा बदाम’ या गाण्याने सर्वसामान्य लोकांना रिल्स बनवून शेअर करायला भाग पाडले. या काही दिवसांतच प्रसिद्ध झालेल्या गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला म्हणजेच भुबन बड्याकर ही आता चर्चेत येत आहे. पण सध्या एक बातमी वाऱ्यासारखी पसरत असून, यावेळी चर्चा एका वाईट घटनेची आहे.

सविस्तर घटना जाणून घ्या..

Advertisement

भुवन बड्याकर आता कोणत्याही गाण्यामुळे नाही तर अपघातामुळे चर्चेत आहे. नुकतीच बातमी आली आहे की, भुवनचा अपघात झाला आहे. चाहत्यांकडून सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं जात आहे. सोमवारी रात्री कार शिकत असताना भुबन बड्याकारचा अपघात झाला आणि अपघातानंतर लगेचच पश्चिम बंगालमधील बीरभूमी येथील रुग्णालयात दाखल (Bhuban Badyakar hospitalised after car accident in West Bengal) करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.

देशात एकूण 12 ज्योतिर्लिंग; जाणून घ्या महाराष्ट्रात 12 पैकी किती ज्योतिर्लिंग आहेत?

प्राप्त माहीतीनुसार, भुबन बड्याकर एका कार अपघाताचा बळी ठरला आहे. सोमवारी रात्री कार शिकत असताना ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्याने काही दिवसांपूर्वी ही कार खरेदी केली होती आणि तो तो शिकण्याचा प्रयत्न करत आहे. आता भुवनच्या छातीत दुखापत झाल्याचे बोलले जात आहे. त्याच्या अपघाताच्या वृत्तानं सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचे चाहते त्यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

Advertisement

भुबन बड्याकरचे कच्चा बदाम’ गाणे आल्यानंतर त्याचे रिमिक्स रिलीज झाल्यावर त्याला यूट्यूबवर रिलीज करण्यात आले असून, या गाण्याला 5 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय त्याला एका गाण्यासाठीही साइन करण्यात आले असून त्यासाठी त्याला तीन लाख रुपयांचा चेक देखील मिळाला आहे. यासोबतच पश्चिम बंगाल पोलिसांनी भुबनचा गौरवही केला आहे. या प्रसिद्धीनंतर भुबन यांनी आता शेंगदाणे विकण्याचं काम सोडलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement