SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केंद्रित करावे. आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडाल. आर्थिक बाबतीत दिवस लाभदायक आहे. प्रवासात यश मिळेल. आज अध्यापनाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. शैक्षणिक स्पर्धेत केलेल्या प्रयत्नांना फळ मिळेल.

वृषभ (Taurus): गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. किराणा दुकान सुरू केले तर पैसा येईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. सासरच्या लोकांकडून फायदा होईल. सहकार्य मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि नशीबही साथ देईल. वाहन वापरताना काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्ण होतील.

Advertisement

मिथुन (Gemini) : आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल राखा. वाहन वापरताना दक्षता घ्या. भेटवस्तू आणि सन्मान मिळेल. उद्योग-धंद्यातून लाभ मिळेल आणि फायदा होईल. गावातील लोकांसोबत मजबूत संबंध होतील.

Advertisement

कर्क (Cancer) : भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. आजचा दिवस तुम्हाला लाभ देणारा आहे. धन, पद, प्रतिष्ठा लाभेल. फालतू खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस लाभदायक आहे. व्यवसायात नव्या योजनांना चालना मिळेल. जीवनसाथीची साथ मिळेल.

Advertisement

सिंह (Leo) : काही गोष्टीत समाधान मानावे लागेल. काही गोष्टींचे चिंतन करावे. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. अवाजवी खर्च टाळा. प्रवासात तुमच्या सामानाची काळजी घ्या, चोरी किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo) : आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील. मन प्रसन्न राहील. नोकरी-व्यवसायामध्ये यश संपादन कराल. सर्वांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. तुमच्या खाण्याच्या-पिण्याच्या सवयींवर संयम ठेवा.

Advertisement

Advertisement

तुळ (Libra) : रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या. धन, मान-सन्मान, यश, कीर्ती वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्य कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. घरातील सहकार्य घेण्यात यश मिळेल.

वृश्‍चिक (Scorpio) : डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. स्वतःच्या खर्चात वाढ होईल. नशीब तुम्हाला साथ देईल. प्रवास आनंददायी आणि लाभदायक ठरेल. वाहन वापरात सावधगिरी बाळगा. दुखापत होऊ शकते. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

Advertisement

धनु (Sagittarius) : वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. दिवसभर आत्ममग्न राहाल. टीकेकडे फार लक्ष देऊ नये. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. आजची गुंतवणूक भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. तब्येतीबाबत हलगर्जीपणा टाळा. धनलाभ होईल. राजकीय दिशेने केलेल्या प्रयत्नांना फळ मिळेल.

Advertisement

मकर (Capricorn) : घरात सामंजस्याने वागावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. मुलांसंबंधित चांगली बातमी मिळेल. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. भाग्य तुम्हाला साथ देईल. विरोधक पराभूत होतील. कोणीतरी तुम्हाला आर्थिक मदत करेल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत. गाडी वापरात सावधगिरी बाळगा. आरोग्याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनोरंजनाच्या संधी मिळतील.

मीन (Pisces) : आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल. काहीतरी मौल्यवान मिळवण्याची इच्छा पूर्ण होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल राखा. आजचा दिवस शुभ असून आर्थिक आणि व्यावसायिक दिशेने केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. तुम्हाला व्यावसायिक फायदा होईल.

Advertisement