SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता एका तासात पीएफ मधील 1 लाख रुपये काढता येणार, काय आहे प्रक्रिया, वाचा..

कोरोनाच्या महामारीत प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या तरी चिंतेने हैराण असतो. नोकरदार वर्गापासून ते प्रत्येक वर्गातील व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांमध्ये पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आपल्या सदस्यांसाठी वैद्यकीय खर्चासाठी पीएफ च्या पैशांतून एक लाख रुपयांची आगाऊ रक्कम मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

💼 बेल्जियम मध्ये आता कर्मचार्‍यांना आठवड्यातील फक्त 4 दिवस काम; भारतातही असं झालं, तर तुम्हाला आवडेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत मांडा

तुम्ही नोकरदार असाल तर तुम्हाला माहीत असेल, प्रत्येक महिन्याच्या पगारातून कर्मचारी पगाराच्या रकमेच्या काही टक्के रक्कम ही पीएफच्या रूपात जमा करतात. हीच पीएफची रक्कम आता तुम्हाला मेडिकल एमर्जन्सीमध्ये अवघ्या एका तासात तुमच्या खात्यात जमा होण्याचा सोपा पर्याय आहे. पूर्वी यासाठी तीन ते सात दिवस लागत होते.

Advertisement

एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आपल्या खात्यातील 1 लाख रूपये हे मेडिकल इमर्जन्सी साठी आगाऊ रकमेच्या रूपात काढण्याची सुविधा सरकारने दिली आहे. कोणत्याही मेडिकल एमर्जन्सीमध्ये जेव्हा तुमच्या कुटुंबातील सदस्य किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल होता तेव्हा या खर्चासाठी पीएफची रक्कम तुम्ही काढू शकता.

▪️ पीएफचे पैसे काढण्यासाठी तुम्हाला https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface या लिंकवर जा.

Advertisement

▪️ मग आपला UAN नंबर आणि पासवर्ड टाका व लॉग इन करा. यानंतर मॅनेज टॅबवर तुमचं KYC पूर्ण करा.

▪️ KYC वेरिफिकेशन नंतर online service टॅबवर जाऊन Claim(Form-31,19 & 10C) हा पर्याय निवडा.

Advertisement

▪️ आता तुमच्या स्क्रिनवर KYC (केवायसी), नोंदणी अशा सुविधा दिसतील. त्यामध्ये आपल्या बॅंकेच्या खाते क्रमांकाचे शेवटचे 4 क्रमांक प्रविष्ट करा व YES हा पर्याय क्लिक करा.

▪️ प्रमाणपत्र स्वाक्षरी केल्यानंतर तुम्हाला Proceed for Online Claim क्लिक करावे लागेल. त्यानंतर एका ड्रॉप डाऊन मेन्यू दिसेल. त्यामध्ये एमर्जन्सी मेडिकल पर्यायावर क्लिक करा.

Advertisement

▪️ या पर्यायाअंतर्गत तुम्हाला पैशांची आवश्यकता, चेकची स्कॅन कॉपी, तुमचा पूर्ण पत्ता ही माहिती द्यावी लागेल.

▪️ त्यानंतर तुम्हाला Get Aadhar OTP हा पर्याय क्लिक करावा लागेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल. हा ओटीपी तुम्हाला सबमिट करावा लागेल.

Advertisement

▪️ सर्व योग्य माहीती दिली की, त्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये क्लेम केलेले पैसे हे 1 तासामध्ये उपलब्ध होतील. खात्रीसाठी कोणते हॉस्पिटल ही सुविधा देईल याची पूर्वतपासणी अवश्य करा.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement