SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खासदार संभाजीराजे यांचे उपोषण अखेर मागे, मराठा समाजाच्या ‘या’ मागण्या मान्य..!

मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरु असलेले उपोषण अखेर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मागे घेतले. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषण करीत होते. अखेर राज्य सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजे यांनी लहान मुलीच्या हाताने ज्यूस पिऊन उपोषण सोडले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आपण एकटेच उपोषण करणार असल्याचे संभाजीराजे यांनी जाहीर केले होते.. मात्र, संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनीही गेले तीन दिवस उपोषण केले. संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी संयोगिताराजे यांनाही रस देऊन त्यांचे आंदोलन सोडवलं.

Advertisement

“संयोगिताराजे यांनी माझं न ऐकता उपोषण केलं आणि माझ्यावर ‘गनिमी कावा’ केला..” असं खासदार संभाजीराजे यावेळी म्हणाले. मराठा समाजासाठी लढा देणाऱ्या आपल्या राजाला पाहून उपस्थितीत कार्यकर्त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते.

संभाजीराजेंनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारतर्फे त्यांची भेट घेतली. व्यासपीठावरच त्यांच्यात चर्चा झाली.

Advertisement

मात्र, लेखी आश्वासनाशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. त्यानंतर मराठा समाजाच्या सगळ्या प्रमुख मागण्या मान्य करीत असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

‘या’ मागण्या मान्य..
– मराठा समाजाला ‘एसईबीसी’ आरक्षणातंर्गत 9 सप्टेंबर 2020 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वी नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण कोर्टाच्या निर्णयानंतर या नोकऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. या उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव एक महिन्यात मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Advertisement

– मराठा समाजातील युवकांना अधिकाधिक नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
– ‘सारथी’च्या व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून 2022 पर्यंत त्याची पूर्तता करणार.
– सारथी संस्थेतील रिक्त पदे 15 मार्च 2022 पर्यंत भरणार.

– सारथी संस्थेच्या 8 उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव 15 मार्च 2022 पर्यंत मंत्रिमंडळासमोर ठेवणार.
– अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी दिले असून, आणखी 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटींचा निधी देणार.

Advertisement

– मराठा समाजाला व्याज परताव्यासंदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा मिळणार. त्यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत. तसंच परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्ज फेडताना व्याज परताव्यासाठी नवी पॉलिसी ठरवू. तसंच कर्जाची मुदत 10 लाखांवरुन 15 लाख रुपये करण्यात आली.

– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळासह इतर संस्थांसाठी पूर्ण वेळ महासंचालक, तसेच इतर कर्मचारी पदांवरही नियुक्ती करु.
– विविध जिल्ह्यांत स्थापन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाची यादी मागवून त्याचा पाठपुरावा करु, तसेच सद्यस्थितीला तयार वसतिगृहाचे गुढीपाढव्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार.
– कोपर्डी खटल्यावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी महाधिवक्त्यांना सूचना करणार.

Advertisement

– मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत आढावा बैठक घेऊन प्रकरणनिहाय निर्णय घेण्यात येतील.
– मराठा आंदोलनातील मृतांच्या नातेवाईकांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. कागदपत्रांची पूर्तता करुन योग्य निर्णय घेऊ.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement