SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठे बदल, ड्रायव्हिंग स्कूलमधील ट्रेनरलाही आता अनुभव आवश्यक..

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचं म्हटलं की प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) रांगेत उभे राहून असेल किंवा फेऱ्या मारणं आलंच, तेव्हा कुठे आपले लायसन्स बनते. नाही. आता केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे नियम अतिशय सोपे केले आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढताना आरटीओला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट द्यायची आवश्यकता असणार आहे. नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत, हे नियम देखील लागू झाले आहेत.

Advertisement

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आरटीओमध्ये जाऊन भल्या मोठ्या रांगेत उभं राहून वाट पाहावी लागणार नाही. तुम्ही तुमच्या शहरातील, जवळील कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी स्वतःची नोंदणी करू शकता. त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल, अर्जदारांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलद्वारे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता.

काय आहेत नवीन नियम?

Advertisement

प्रशिक्षण केंद्रांसंबंधी रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडून नागरिकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि काही अटीही सरकारने जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश असणार आहे.

ड्रायव्हिंग स्कूलमधील ट्रेनरची शैक्षणिक पात्रता किमान वी पास आवश्यक आहे आणि त्या व्यक्तिला कमीत कमी 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असला पाहिजे आणि वाहतुकीचे नियम माहीत असायला हवेत.

Advertisement

देशाच्या मंत्रालयाने हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूलमधील या कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त 4 आठवडे 29 तासांपर्यंत असेल. तसेच या ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम लेखी आणि प्रॅक्टिकल अशा 2 भागांमध्ये विभागला जाणार असल्याचे सांगितले.

अधिकृत एजन्सी हे ठरवू करेल की, दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांना कमीत कमी एक एकर जागा असायला हवी तर मध्यम आणि अवजड प्रवासी वाहने किंवा मालवाहू वाहने व ट्रेलरसाठी कमीत कमी दोन एकर जागा असणे गरजेचे आहे.

Advertisement

भारतातील लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ-उतारावर कोणतेही वाहन चालवायला व शिकण्यासाठी 21 तास घालवावे लागतात. यामध्ये लेखी भाग संपूर्ण अभ्यासक्रमाच्या 8 तासांचा असेल, यामध्ये रस्ता शिष्टाचार समजून घेणे, रस्त्यावरील वाहन चालवण्याचा अंदाज, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालवण्याची इंधन कार्यक्षमता या सर्व बाबी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement