SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी पास उमेदवारांना नौदलात नोकरीची संधी, तब्बल 127 जागांसाठी भरती सुरु..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय नौदलात तब्बल 127 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.. अगदी दहावी पास असणाऱ्यांनाही नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. नौसेना वेस्टर्न नेवल कमांड, मुंबई (Indian Navy Western Naval Command Mumbai) इथे ही भरती होत आहे.

नौदलातील भरतीबाबतची अधिसूचना (Indian Navy Western Naval Command Mumbai Group C-Staff Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. या नोकर भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 127

या पदांसाठी भरती
– फार्मासिस्ट (Pharmacist) – 01
– फायरमॅन (Fireman) – 120
– पेस्ट कंट्रोल ऑफिसर (Pest Control Worker) – 06

Advertisement

शैक्षणिक पात्रता

फार्मासिस्ट (Pharmacist) – उमेदवाराने दहावीपर्यंत किंवा समतूल्य शिक्षण घेतलेलं असावं.. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण झालेलं असावं.. संबंधित पदाचा किमान अनुभव आवश्यक.

Advertisement

फायरमॅन (Fireman) – दहावीपर्यंत किंवा समतुल्य शिक्षण असणं आवश्यक. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेलं असावं.. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम व संबंधित पदाचा किमान अनुभव असावा.

पेस्ट कंट्रोल ऑफिसर (Pest Control Worker) – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावीपर्यंत किंवा समतुल्य शिक्षण, संबंधित पदाचा किमान अनुभव, तसेच स्थानिक किंवा हिंदी भाषा बोलता यायला हवी.

Advertisement

आवश्यक कागदपत्रं
Resume (बायोडेटा)
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

Advertisement

नौसेना वेस्टर्न नेवल कमांड मुख्यालय, टायगर गेट, मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2022

Advertisement

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठीhttps://www.indiannavy.nic.in/

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

 

Advertisement