देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर म्हणजे, अर्थातच ‘होंडा अॅक्टिव्हा’..! रस्त्यावर सर्वाधिक दिसली जाणारी स्कूटर.. विविध फिचर्समुळे जपानी होंडा कंपनीची ही स्कूटर ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.. शिवाय सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये येत असल्याने ‘होंडा अॅक्टिव्हा’चा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे..
💼 बेल्जियम मध्ये आता कर्मचार्यांना आठवड्यातील फक्त 4 दिवस काम; भारतातही असं झालं, तर तुम्हाला आवडेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत मांडा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे.. विविध कंपन्या जबरदस्त फिचर्ससह आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहेत. त्यात आता तुमच्या लाडक्या स्कूटरची भर पडणार आहे..
होय.. ‘होंडा अॅक्टिव्हा’ आता इलेक्ट्रिक स्वरुपात बाजारात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.. होंडा कंपनी 2024 पर्यंत जागतिक स्तरावर किमान 3 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. मात्र, त्यापैकी किती मॉडल्स भारतात लाँच होतील, याबाबत कंपनीने स्पष्ट माहिती दिलेली नाही.
भारतात सध्या स्कूटर सेगमेंटमध्ये होंडा अॅक्टिव्हा (Honda Activa) आघाडीवर आहे. बाजारात आता तिची सहावी जेनरेशन माॅडेल उपलब्ध आहे. ‘होंडा’ आता भारतात इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) लाँच करणार आहे. याबाबत ‘होंडा’चे अध्यक्ष आत्सुशी ओगाता म्हणाले, की एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होऊ शकते.
भारतात ‘अॅक्टिव्हा’ मिळणारा जबरदस्त प्रतिसाद पाहता, इलेक्ट्रिक स्कूटरही ‘अॅक्टिव्हा’वर आधारित असेल, असे बोलले जात असले, तरी ‘होंडा’ कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ‘होंडा’ची ‘बेन्ली ई स्कूटर’ काही दिवसांपूर्वीच भारतात चाचणी करण्यात आली होती…
स्वॅपेबल बॅटरी असणार.?
भारतात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये ओला (Ola), अथेर (Ather) कंपन्यांबरोबर बजाज, टीव्हीएसनेही उडी घेतली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये वरचढ ठरण्यासाठी होंडा कंपनी आपल्या ‘अॅक्टिव्हा’ ब्रँडचा वापर करु शकते. तसेच ही स्कूटर ‘स्वॅपेबल बॅटरी’ तंत्रज्ञानासह मिळणार असल्याचे बोलले जाते..
‘स्वॅपेबल बॅटरी’ तंत्रज्ञानाबाबत..
बॅटरी स्वॅपिंग म्हणजे, वापरकर्ता त्याच्या स्कूटरमध्ये पुरवलेल्या बॅटरी व्यतिरिक्त अतिरिक्त बॅटरी ठेवू शकतो. गरजेनुसार ती कधीही सहज बदलू शकतो. इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी चार्ज होण्यासाठी किमान काही तास लागतात. ‘बॅटरी स्वॅपिंग’मुळे ग्राहकाला वाहनाची बॅटरी वारंवार चार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळते.