SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विनोद कांबळीला मुंबई पोलिसांनी केली अटक, वादग्रस्त कांबळीने आता ‘हे’ काय केलं..?

भारतीय क्रिकेटमधील एक वादग्रस्त नाव म्हणजे, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी… एक प्रतिभाशाली फलंदाज असणारा विनोद कांबळी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीपेक्षा वादामुळेच चर्चेत राहिला.. विनोद कांबळीचे अख्खे क्रिकेट करीयर या वादांमुळेच झोकाळले गेले. ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचा हा मित्र उत्तम फलंदाजीचं तंत्र असूनही मागेच राहिला..

हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, विनोद कांबळी पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे.. दारुच्या नशेत गाडी चालवून सोसायटीचे गेट तोडल्याप्रकरणी पोलिसांनी कांबळीला रविवारी (ता. 27) अटक केली.. नंतर त्याची जामीनावर सुटकाही करण्यात आल्याचे समजते..

Advertisement

नेमकं काय झालं..?
मुंबईतील वांद्रा परिसरात कांबळी राहतो.. दारुच्या नशेत रविवारी दुपारी कांबळीची गाडी त्याच्या इमारतीच्याच गेटवर धडकली. त्यावरून सोसायटीचा वॉचमन, तसेच काही रहिवाशांसोबत त्याचा वाद झाला. नंतर हा वाद इतक्या विकोपाला गेला, की इमारतीतील रहिवाशांनी त्याच्याविरुद्ध थेट वांद्रे पोलिसांत तक्रार केली.

रहिवाशांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कांबळीला अटक केली. वेगाने गाडी चालवणे, लोकांचा जीव धोक्यात घालणे, इमारतीच्या संपत्तीला धोका पोहोचवणे, आदी गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. इमारतीच्या गेटला गाडी आदळली, तेव्हा विनोदने मद्यपान केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Advertisement

याबाबत तपासासाठी पोलिसांनी कांबळीची वैद्यकीय तपासणी केली असून, त्याच्या रक्ताचे नमुनेही चाचणीसाठी घेतले आहेत. याबाबतचा अहवाल आल्यावरच सगळे काही स्पष्ट होणार आहे. वांद्रे पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

विनोद कांबळीची फसवणूक
दरम्यान, गेल्या वर्षी अशाच एका प्रकरणामुळे विनोद कांबळीचे नाव चर्चेत आलं होतं.. ‘केवायसी’ डिटेल्स अपडेट करण्याच्या नावाखाली खासगी बॅंकेचा अधिकारी असल्याचे सांगून एकाने कांबळीला 1.13 लाख रुपयांना गंडा घातला होता. याबाबत वांद्रे पोलिसांत सायबर फसवणूक झाल्याची तक्रार कांबळीने केली होती..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement