SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): मानसिक चुळबुळ कमी करावी. काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते. आज जागरूकतेनं काम करणं महत्त्वाचं आहे. कायदेशीर बाबी लवकरच मार्गी लागतील. गुंतवणूक करताना सावधगिरीने करा. काही वेळा परिणाम दिसायला वेळ लागतो.

वृषभ (Taurus): विद्यार्थी वर्ग खुश असेल. कामे उरकताना दमछाक होऊ शकते. आज तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त उत्साही वाटेल. नेहमीपेक्षा अधिक नीटनेटकं नियोजन करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तुम्ही पूर्वी कोणाला मदत केली असेल तर ती व्यक्ती कदाचित तुम्हाला त्याची परतफेड करण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini) : कामात सकारात्मक बदल संभवतात. नियोजनबद्ध कामे करा. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका. तुम्ही जो काही पसारा मांडला आहे, तो कमी करण्याची वेळ आली आहे. नुकत्याच भेटलेल्या कोणावरही विश्वास ठेवू नका. मित्रपरिवार काहीतरी मस्त बेत आखत असेल तर आज तुम्हाला ते कळू शकतं.

Advertisement


कर्क (Cancer) : कचेरीची कामे मार्गी लावाल. ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. विशेषत: कोणत्याही भागीदारीसाठी. लवकरच एखादी नवीन भूमिका पार पाडण्याची वेळ येऊ शकते. नवीन काम, प्रोजेक्ट हाती घेतला असेल आणि अडथळे येत असतील तर तो लगेच सोडून देऊ नका.

सिंह (Leo) : कामात सकारात्मक बदल संभवतात. नियोजनबद्ध कामे करा. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका. मन स्थिर ठेऊन विचार करावा. तुम्ही प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करू शकत नाही. मातृपक्षाकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. दिवस बर्‍यापैकी व्यस्त राहील. आपल्या धाडसाचे फळ मिळेल.

कन्या (Virgo) : घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल. मन स्थिर ठेऊन विचार करावा. अचानक घडलेल्या अनपेक्षित आणि सकारात्मक गोष्टींमुळे आश्चर्याचा धक्का बसेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबातला नवीन सदस्य तुमच्याकडे अपेक्षेनं पाहत असेल.

Advertisementतुळ (Libra) : कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील. तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल. अति धाडस दाखवू नका. ज्यांना बाहेर फिरायला आवडतं ते लवकरच काही तरी योजना आखण्याची शक्यता आहे. आधी आव्हानात्मक वाटणाऱ्या कामावर नवीन उपाययोजना मिळू शकतात. कुटुंबाला थोडा वेळ द्या.

वृश्‍चिक (Scorpio) : मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. जुगार खेळतांना सावध राहावे. हातातील गोष्टी जपून ठेवा. जुनी कामे आधी मार्गी लावावीत. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. किरकोळ डोकेदुखी किंवा वेदना दिवसभर त्रासदायक ठरू शकतात. नवीन गोष्टींशी जुळवून घेणं आव्हानात्मक असलं तरी ते करू शकता.

धनु (Sagittarius) : मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल. चंचलतेवर मात करावी लागेल. आर्थिक नियोजनावर विचार कराल. आज हातात असलेली तुमची अनेक कामं पूर्ण होतील. त्यामुळं तुम्हाला खूप नशीबवान असल्याचं वाटेल; मात्र तुमचे हुकमाचे सर्व एक्के एकाचवेळी वापरू नका. साधा आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा.मकर (Capricorn) : आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल. आपली क्षमता लक्षात घ्यावी. लवकरच कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचा योग आहे. बरेच दिवस रखडलेली कामं निवांतपणे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. नवीन काम अंगावर येऊ शकते.

कुंभ (Aquarious) : सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरगुती गैरसमज टाळावेत. काही खर्च अचानक सामोरे येतील. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल. वेळेचं योग्य नियोजन नसल्यानं किंवा निश्चित दैनंदिन वेळापत्रक नसल्यानं दिवसभर खूप धावपळ करावी लागू शकते. वरिष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल.

मीन (Pisces) : जवळचे मित्र भेटतील. हातातील कामातून आनंद मिळेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. चंचलतेवर मात करावी लागेल. तुमच्या भावना दडपून टाकू नका. जिच्याशी तुम्ही तुमच्या मनातील भावना शेअर करू शकता अशी एखादी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. गेट टुगेदर होण्याची शक्यता आहे.

Advertisement