SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्वस्तात सोने खरेदी करण्याची शेवटची संधी, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घ्या..!

भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघत असल्याचे म्हटलं जातं.. हे थोडसं अतिशयोक्ती वाटत असलं, तरी त्यातून भारतीयांना फार पूर्वीपासूनच सोन्याचे वेड असल्याचं दिसतं.. सणासुदीला, लग्न सोहळ्यानिमित्त आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. गेल्या काही दिवसांत जगावर युद्धाचे ढग दाटल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केली जात आहे..

सोन्याची मागणी वाढत असल्याने त्याच्या दराने 50 हजारांची पातळी कधीच ओलांडली आहे. शिवाय येणाऱ्या काळातही सोन्याचे दर असेच चढे राहणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. अशा वेळी तुमच्यासाठी स्वस्तात सोने खरेदीची संधी चालून आलीय…

Advertisement

मोदी सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस स्वस्तात सोने खरेदीचा पर्याय दिला आहे. ‘सोव्हेरन गोल्ड बॉंड’ची या वर्षातील अखेरची सिरीज (Sovereign Gold Bond) उद्यापासून (ता. 28 फेब्रुवारी) सुरु होत असून, ती 4 मार्चपर्यंत चालणार आहे, म्हणजेच स्वस्तात सोने खरेदीसाठी तुमच्याकडे पाच दिवस असतील.

‘सोव्हेरन गोल्ड बॉंड’मध्ये एक ग्रॅम सोन्याची किंमत 5,109 रुपये निश्चित केली आहे. त्यातही ऑनलाइन पेमेंट केल्यास 50 रुपयांची सूट दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला 5059 रुपयांमध्ये एक ग्रॅम सोने खरेदी करता येणार आहे.. सध्या बाजारात 1 ग्रॅम सोन्याचा दर 5100 रुपयांच्या आसपास आहे. अशा वेळी मोदी सरकार तुम्हाला स्वस्तात सोने विकत आहे.

Advertisement

केंद्र सरकारकडून जारी केल्या जाणाऱ्या ‘सोव्हेरन गोल्ड बॉंड’मध्ये गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष सोने मिळत नाही. पण, हे सोने फिजिकल सोन्यापेक्षाही सुरक्षित असते. रिझर्व्ह बॅंक किंवा अर्थमंत्रालयाकडून हे सुवर्णरोखे बाजारात आणले जातात. त्यात किमान 1 ग्रॅम ते जास्तीत जास्त 4 किलो सोन्यासाठी गुंतवणूक करता येते. प्रमाणपत्राच्या स्वरुपात 8 वर्षांसाठी केलेली ही गुंतवणूक असते.

सध्या गुंतवणूक केल्यावर 8 वर्षांनंतर त्यावेळच्या सोन्याच्या भावाप्रमाणे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य होते. सोन्यातील ही गुंतवणूक सरकारी बॉंडमध्ये असल्याने ती अत्यंत सुरक्षित मानली जाते. शिवाय त्यातून चांगला परतावाही मिळतो.

Advertisement

किती व्याज मिळेल ?
‘सॉवरेन गोल्ड बॉन्ड’ योजनेचा मॅच्युरिटी काळ 8 वर्षांचा असतो. पुढील व्याज भरण्याच्या तारखेला 5 वर्षांनंतर बाँडमधून गुंतवणूक काढून घेण्याचा पर्याय असतो. त्यावर वार्षिक 2.5 टक्के दराने व्याज मिळते. हे व्याज दर 6 महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा केले जाते.

कसं खरेदी कराल..?
एनएसई (NSE), बीएसई (BSE) सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजमधून तुम्ही ‘सॉवरेन गोल्ड बॉन्ड’ खरेदी करू शकता. शिवाय सार्वजनिक किंवा खासगी बँकाही सुवर्ण रोखे खरेदीचा पर्याय देतात. ‘स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (SHCIL) आणि ‘पोस्ट ऑफिस’मधूनही हे खरेदी करता येते. ‘स्मॉल फायनान्स बँक’, पेमेंट बँकांकडून त्याची विक्री केली जात नाही.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement