SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘पुष्पा’ चित्रपटाचे राज ठाकरे यांनीही केले कौतुक..! म्हणाले, ‘चित्रपट पाहिल्यावर मला कळलं, की..’

आज 27 फेब्रुवारी…मराठी भाषा दिन.. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठीचा खास दिवस.. यानिमित्ताने ठिकठिकाणी मराठी भाषेचा जागर सुरु आहे.. मराठी भाषा दिन आला, की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार, हा मुद्दा उफाळून वर येतो.. पण तो तेवढ्यापुरताच.. नंतर हे सगळे मुद्दे मागे पडत जातात..

मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नुकताच एक कार्यक्रम झाला. त्यात मराठी भाषेसाठी कायम आग्रही असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी मराठी टिकवण्यासाठी आधी मराठीत बोलणं गरजेचं आहे. मराठी बोलताना लाज वाटायची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं.

Advertisement

राज ठाकरे काय म्हणाले..?
मराठी भाषेचे महत्व सांगताना, राज ठाकरे यांनी नुकताच गाजत असलेल्या दाक्षिणात्य ‘पुष्पा’ चित्रपटाचे उदाहरण दिले.. ते म्हणाले, की “‘पुष्पा’ चित्रपट हिंदीत येण्यापूर्वीच तुमच्यातले आणि माझ्या काही ओळखीच्या लोकांनी तो ‘तेलगू’ भाषेत पाहिला होता. माझा एक मित्र म्हणाला, की ‘पुष्पा’ चित्रपट मला पहिले कळलाच नाही, कारण मला ते काय आहे, हे माहित नव्हतं..”

Advertisement

‘पुष्पा’ चित्रपट नुकताच रिलिज झाला होता. तो मला म्हणाला, की ‘पुष्पा’ हा तेलगू चित्रपट बघ.. त्यावर मी म्हणालो, तू तेलगूत पाहिला का? तर तो म्हणाला, की या चित्रपटाला भाषेची गरजच नाही.. नंतर हा चित्रपट पाहिल्यावर मला कळलं, की कोणत्याही भाषेची गरजच नाही त्याला.. मला असं म्हणायचं आहे. तुम्ही तुमच्या गोष्टीवर ठाम राहा ना.. नंतर त्यांनी हा चित्रपट हिंदी व इतर भाषेत आणला..!, असे राज ठाकरे पुढे म्हणाले..

ते म्हणाले, की काही मूठभर लोकांसाठी मराठीत पाट्या लावायच्या नाही का? बरेच लोक मराठीत संवाद साधत नाही, हे दुर्दैव आहे. मराठी भाषेत बोलण्यात कमीपणा का वाटतो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement