SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज हाॅस्पिटलमध्ये, मैदानावर घडली काळजाचा ठोका चुकवणारी घटना..!

धर्मशाला येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ‘टीम इंडिया’ने श्रीलंका संघावर 7 विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, त्याच वेळी भारतीय क्रिकेट रसिकांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे..

टीम इंडियाचा धडाकेबाज ओपनर इशान किशनला (Ishan Kishan) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. श्रीलंका संघाने प्रथम बॅटिंग करताना भारतासमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा अवघ्या 1 धावांवर बोल्ड झाला. त्यामुळे इशानवर मोठी जबाबदारी आली होती..

Advertisement

भारतीय संघ धावांचा पाठलाग करीत असताना, चौथे षटक टाकण्यासाठी श्रीलंकेचा फास्ट बॉलर लाहिरू कुमार आला. त्याने दुसराच बाॅल तब्बल 146 किमी प्रति तास वेगाने ईशानवर बाऊन्सर टाकला.. हा बाॅल हूक करण्याचा ईशानचा प्रयत्न फसला नि बाॅलने इशानच्या डोक्याचा वेध घेतला.. त्यानंतर हेल्मेट काढून ईशान मैदानातच बसला.

Advertisement

टीम इंडियाच्या फिजिओंनी मैदानात धाव घेतली. त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर इशानने काही काळ बॅटिंग केली, पण त्यानंतर 15 बॉलमध्ये 16 रन काढून तो आऊट झाला.

मयांकला संधी मिळणार..?
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून इशानला कांगडामधील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. इशानच्या डोक्याचं सीटी स्कॅन करण्यात आलं असून, त्यात गंभीर दुखापत नसल्याचे डॉक्टरांनी म्हटलं आहे. सध्या इशानला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

Advertisement

दरम्यान, आज  (रविवारी) या मालिकेतील तिसरा सामना होत आहे. मालिका आधीच जिंकलेली असल्याने या सामन्यात इशानला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी मयांक अग्रवालचा टीममध्ये समावेश होऊ शकतो.

दिनेश चंडीमलही हॉस्पिटलमध्ये
श्रीलंकेचा विकेट किपर दिनेश चंडीमल यालाही मैदानावर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झालीय. त्याच्या हाताला मार लागला असून, त्यालाही फोर्टिस रुग्णालयातच दाखल करण्यात आलं आहे. खबरदारीचे पाऊल म्हणून ईशान व दिनेश यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement