SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खळबळजनक..! टीम इंडियाच्या खेळाडूंच्या बसमध्ये आढळली काडतुसे, खेळाडूंच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा..!

टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेतील अखेरचा सामना आज (ता. 27) खेळत आहे.. त्यानंतर येत्या 4 मार्चपासून या दोन्ही संघांमधील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.. त्यासाठी दोन्ही संघातील बहुतांश खेळाडू चंदीगडमध्ये दाखल झाले असताना, एक खळबळजनक बातमी समोर आली आहे..

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या बसमध्ये काडतूसाची दोन खोकी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतीय खेळाडूंना सरावासाठी स्टेडियमपर्यंत सोडणाऱ्या बसमध्ये काडतूसाची ही दोन खोके सापडली. ही काडतुसे 32 बोर पिस्तुलाची असल्याचे सांगण्यात आले.. या प्रकारामुळे खेळाडूंच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा समोर आला आहे..

Advertisement

नेमकं काय झालं..?
मोहालीतील ‘पीसीए’ क्रिकेट स्टेडियमवर येत्या 4 मार्चपासून भारत विरुद्ध श्रीलंकेतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यासाठी कसोटी संघात निवड झालेले बहुतांश खेळाडू चंदीगडमध्ये आले आहेत.. या खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था चंदीगडमधील एका आलिशान ‘हॉटेल ललित’मध्ये केली आहे.

दरम्यान, टीम इंडियातील कसोटी संघाचे खेळाडू शनिवारी (ता. 26) दुपारी एक वाजता ‘पीसीए’ क्रिकेट स्टेडियममध्ये सरावासाठी जाणार होते. त्यासाठी ‘तारा ब्रदर्स’ची बस ‘हॉटेल ललित’बाहेर उभी होती. खेळाडू बसमध्ये चढण्यापूर्वी तिची तपासणी केली असता, बसमध्ये काडतुसांची दोन खोकी आढळून आली. सुरक्षा पथकाने ही काडतुसे जप्त केली.

Advertisement

बसमध्ये सापडलेली रिकामी काडतुसे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.. ही काडतुसे पिस्तुलाची असल्याचं सांगण्यात आलं.. काडतुसे सापडल्याची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह तेथे शोध घेतला. सोबतच मोहालीतील ‘पीसीए क्रिकेट स्टेडियम’मध्येही तपासणी करण्यात आली.. खेळाडूंना दुसऱ्या बसमधून स्टेडियममध्ये पाठविण्यात आलं.

कसोटीसाठी ‘हे’ खेळाडू दाखल
‘हाॅटेल ललित’मध्ये आर अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, शुभमन गिल, हनुमा विहारी, प्रियांक पांचाळ, उमेश यादव, जयंत यादव, सौरभ कुमार आणि केएस भरत हे खेळाडू थांबले आहेत. विराट कोहली आणि ऋषभ पंतही शनिवारीच संघात सामील झाले. त्याच वेळी हा प्रकार समोर आल्याने या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Advertisement

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे खेळाडू सध्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहेत. हे खेळाडू 28 फेब्रुवारीपासून सरावाला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement