SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): भावंडांना मदत कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका. घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. आपण सकारात्मक परिणामांची अपेक्षा करू शकतात. स्वत: च्या चुका समजून घेतल्यास पुढील मार्ग सापडेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.

वृषभ (Taurus): दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल. प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. या राशीच्या लोकांनी भूतकाळाचा जास्त विचार न करता समोर असलेले लक्ष्य पूर्ण करावे. समस्या समजून सोडवल्या जाऊ शकतात.

कट्टर प्रतिस्पर्धी असणारे MI आणि CSK यंदा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?.

मिथुन (Gemini) : घरगुती वातावरण उत्तम राहील. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर टाळावा. वाईट सवयींमुळे आयुष्यातील मौल्यवान वेळ वाया घालवताल. प्रिय व्यक्तींच्या कृतीमुळे खूप दुखावले जातात. घरातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते. परदेशी कंपन्यांमध्ये काम मिळू शकते.

कर्क (Cancer) : धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. आंधळा विश्वास ठेऊ नका. कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. काही लोक थोडं लांब जाऊन वेळ घालून शकतात. काही लोक एखाद्या जुन्या मित्राच्या संपर्कात राहतील. कौटुंबिक जीवनात सुखद बदल होऊ शकतात.

सिंह (Leo) : वैचारिक स्थैर्य बाळगा. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला. व्यावसायिक समस्या हाताळताना या लोकांना प्रामाणिक असणे आवश्यक आहे. तुमची मोठी भावंडे तुम्हाला चांगल्या मित्राप्रमाणे सल्ला देताना दिसतील.

Advertisement

कट्टर प्रतिस्पर्धी असणारे MI आणि CSK यंदा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?.

कन्या (Virgo) : आहाराची पथ्ये पाळावीत. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. आवडी-निवडी कडे अधिक लक्ष द्याल. महत्त्वाकांक्षी तरुणाला करिअरशी संबंधित महत्त्वाचा सल्ला देऊ शकतात. लालसेच्या मोहात पडू नका. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. हातातील संधी सोडू नका.

तुळ (Libra) : धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. काहीतरी चटपटीत खायला आवडेल. फसवणूक होऊ शकते. सावध राहावे लागेल. कौटुंबिक जीवनात सावधगिरी बाळगा. जोडीदाराशी बोलताना तुम्ही शब्दांचा योग्य वापर करावा.

वृश्‍चिक (Scorpio) : कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल. कोणत्याही वादाचा भाग बनून या लोकांना फायदा होणार नाही. कर्तृत्वाने तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतही चांगली कामगिरी करू शकता.

धनु (Sagittarius) : काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. वरिष्ठांच्या मतानेच चालावे. झोपेची तक्रार जाणवेल. या राशीच्या लोकांना सरकारी काम करताना काळजी घ्यावी लागेल. तुमच्या बोलण्यातून आत्मविश्वास दिसेल ज्यामुळे सामाजिक स्तरावर चांगले परिणाम मिळू शकतात. काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात.

मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल. या राशीचे काही लोक मुलाच्या बाजूने चिंतेत दिसू शकतात. जमीन किंवा घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या राशीच्या लोकांचे स्वप्न आज पूर्ण होऊ शकते. साहसी काम करणाऱ्या या राशीच्या लोकांना काही संधी मिळू शकते.

Advertisementकुंभ (Aquarious) : कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा. हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल. आईच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. काही सरकारी अडथळ्यांमुळे कोणतेही रखडलेले काम आज पूर्ण होऊ शकते. धैर्य आणि सामर्थ्यामध्ये वाढ दिसेल.

मीन (Pisces) : बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा. मनातील साशंकता दूर करावी. व्यावसायिक योजनावर विचार कराल. वरिष्ठांकडून मिळणाल्या सूचनांकडे दूर्लक्ष करू नये. जीवनात काय करायचे आहे, हे निश्चित करणे आवश्यक आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही सहकाऱ्यांना मदत करतांना दिसून याल.

Advertisement