SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘मारुती सुझुकी’ची बजेटमधील कार लाॅंच, जबरदस्त मायलेजसह मिळणार दमदार फीचर्स..!

आपल्या घरापुढं हक्काची एक कार असावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असंत.. मात्र, सध्या कारच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाचंच स्वप्न साकार होईल, असं नाही.. मात्र, आता तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.. कारण, अगदी तुमच्या बजेटमधील कार ‘मारुती सुझुकी’ने लाॅंच केली आहे.

भारतातील सर्वात मोठी वाहन निर्मिती कंपनी असलेल्या ‘मारुती सुझुकी’च्या ‘वेगनआर’ कारला अनेकांची पसंती मिळाली. सध्या देशातील ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.. अनेकांच्या पसंतीच्या हॅचबॅक कार ‘मारुती वेगनआर’ला कंपनीने ‘अपडेट’ करून बाजारात आणले आहे..

Advertisement

‘मारुती सुझुकी’ने ‘मारुती वेगनआर फेसलिफ्ट’ (2022 WagonR facelift version) भारतात लाँच केली आहे. जुन्या ‘वेगनआर’पेक्षा ‘वेगनआर फेसलिफ्ट’ कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या कारमध्ये ग्राहकांना कोणकोणते फीचर्स मिळतील, त्याची किंमत किती, मायलेज किती असेल, अशा साऱ्या प्रश्नांची माहिती जाणून घेऊ या…

‘मारुती वेगनआर फेसलिफ्ट’ची वैशिष्ट्ये
कारमध्ये खास ‘एक्सटीरियर’ आणि ‘इंटिरियर’ फीचर्स जोडले आहेत.
– ‘हॅचबॅक’मध्ये अपडेटेड के-सीरीज इंजिन दिले आहे. जी स्टार्ट-स्टॉप टेक्नोलॉजी सोबत येते. या हॅचबॅकला आता ड्युअल टोन कलर ऑप्शनमध्ये आणले आहे. सोबत स्पोर्टी अलॉयड व्हील्ज दिले आहे.
– ड्युअल टोन इंटिरियरसोबत 7 इंचाचा स्मार्ट प्ले स्टूडिओ सिस्टम, स्मार्टफोन नेव्हिगेशन आणि 7 स्पीकरचे ऑडियो सिस्टमची सुविधा आहे.
– सोबतच सर्व स्टँडर्ड व सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
– कारमध्ये दोन ड्युएल टोन कलरचा समावेश आहे. ‘गॅलंट रेड विथ ब्लॅक रूफ’ आणि ‘मॅग्मा ग्रे विथ ब्लॅक रूफ’ यांसह आणखी काही रंगांत ही कार उपलब्ध आहे..

Advertisement

‘मायलेज’बाबत…
‘मारुती वेगनआर’ कार पेट्रोल इंजिनसोबत ‘सीएनजी’ ऑप्शनमध्ये आणली आहे. त्याचे मायलेज जुन्या ‘वेगनआर’च्या तुलनेत जास्त असणार आहे. ‘वेगनआर फेसलिफ्ट’च्या 1.0 लिटर पेट्रोल इंजिन मॉडलचे मायलेज 16 टक्क्यांनी वाढून 25.19 किमी प्रति लिटर केले आहे, तर 1.2 लिटर पेट्रोल मॉडलचे मायलेज 19 टक्क्यांनी वाढवून 24.43 किमी प्रति लिटर केले आहे. तसेच ‘सीएनजी’चे मायलेज 34 किमी प्रति किलो असणार आहे..

किंमतीबाबत…
‘मारुती वेगनआर फेसलिफ्ट’ची बेसिक किंमत 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल. टॉप-स्पेक ट्रिममध्ये त्याची किंमत 7.10 लाख रुपयांपर्यंत जाते. सीएनजी (CNG) माॅडेलची किंमत 6.81 लाख (एक्स-शोरूम) आहे.

Advertisement

सब्सक्रिप्शन ऑफर
नवी ‘मारुती वेगनआर फेसलिफ्ट’ला कंपनीने ‘पॅसेंजर टॅक्सी सेगमेंट’मध्ये आणले आहे. सोबतच कंपनीने या कारला 12 हजार 300 रुपये ‘मंथली सब्सक्रिप्शन’वर देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात रजिस्ट्रेशन, सर्व्हिस, मेंटनेंन्ससोबत इंन्शुरन्स व रोडसाइड असिस्टंन्सची सुविधा असेल.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement