SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढायचं? वाचा फायदे आणि अर्जप्रक्रिया..

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स हे तुमच्याकडे सध्या असणाऱ्या लायसन्स सारखेच असते. फक्त आरटीओ (RTO) तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे परदेशातील अधिकारी समजू शकतील अशा भाषांमध्ये भाषांतर करतात. हे लायसन्स रोड ट्रान्सपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे जारी केले जाते, यामुळे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स (international driving license) धारक लोक बाहेरील काही देशातही वाहन चालवू शकतात.

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सचे अनेक फायदे आहे. त्यापैकी एक फायदा असा आहे की, तुम्हाला कोणत्याही समस्येविना परदेशातील रस्त्यावर वाहन चालवता येते. परदेशात गेले असता आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही पासपोर्टऐवजी वैध ओळख पुरावा म्हणून देखील वापरू शकता.

Advertisement

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रे:

▪️ सध्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत

Advertisement

▪️ डेटा रेकॉर्डसाठी तुम्ही प्रवास करत असलेल्या देशाच्या पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत.
▪️ प्रवासासाठी काढलेल्या तिकिटाची प्रत.
▪️ तुमच्या वयाचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्याची प्रत.
▪️ भारतीय नागरिकत्वाचा प्रमाणित पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो.
▪️ योग्यरित्या स्वाक्षरी केलेले आणि डॉक्टरांनी जारी केलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र

अर्ज करण्याची प्रक्रिया:

Advertisement

▪️ तुम्हाला वरील आवश्यक कागदपत्रांसह आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी फॉर्म भरून सबमिट करणे आवश्यक आहे.

▪️ अर्जदाराला वैद्यकीय आरोग्य फॉर्म CMV 1 आणि 1A भरावा लागेल. अर्जदाराने काही आरोग्य समस्या असल्याच ती लपविण्याचा प्रयत्न करू नये.

Advertisement

▪️ फॉर्म CMV 4 हा तुमचा प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज आहे. हा फॉर्म आरटीओच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा कोणत्याही आरटीओ ऑफिसवर तुम्हाला मिळून जाईल.

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या ऑफलाईन अर्जासाठी, तुम्हाला तुमच्या प्रादेशिक RTO ला भेट द्यावी लागेल. वरील सूचीमध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याची एक विशिष्ट रक्कम फी म्हणून भरावी लागेल. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऑफलाइन आहे. इंटरनॅशनल कंट्रोल ट्रॅफिक असोसिएशनच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आवश्यक फॉर्म डाऊनलोड करा आणि फॉर्म भरा. तुम्ही गुगलवर International Driving Licence असं जरी सर्च केलं तरी तुम्ही अधिक माहीती मिळवाल.

Advertisement

कोणत्या देशांत भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सला मान्यता?

अनेक लहान देशांसह अनेक मोठे देश आहेत जे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स स्वीकारतात. हा ड्रायव्हिंग लायसन्स स्वीकारणारे काही प्रमुख देश म्हणजे युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपीय उपखंडातील अनेक देश भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स स्वीकारतात. फ्रान्स, स्वीडन आणि जर्मनी सारखे काही देश त्यांच्या राष्ट्रीय भाषांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मागणी करतात, तर युनायटेड किंगडम आणि स्वित्झर्लंड सारखे इतर देश फक्त इंग्रजीमध्ये परवाने स्वीकारतात.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement