SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

25 हजार रुपयांत तब्बल 60 लाख रुपयांचा फायदा, त्यासाठी करा फक्त ‘या’ झाडांची लागवड..

पारंपरिक पीकपद्धतीत उत्पादन खर्च काढणे देखील दिवसेंदिवस कठीण बनत असल्याने शेतकरी बांधवानी आता आधुनिकतेची कास धरली आहे. सध्याच्या महागाईचा विचार करता भविष्यात चांगले जीवन जगण्यासाठी आपल्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या साइड बिझनेसची आवश्यकता असेल. मग तुम्ही निलगिरीच्या झाडांची लागवड करून नफा कसा मिळवू शकता.

तुम्ही 1-3 एकर जमिनीवर फक्त 25,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह निलगिरीची झाडे वाढवू शकता आणि 5 वर्षांत 72 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता, ती कशी ते पाहू..

Advertisement

▪️ निलगिरी (Eucalyptus) हे वेगाने वाढणारे, 20-500 मीटर उंची असणारे आणि 2 मीटरपर्यंत व्यास असणारे झाड आहे.

भारतातील जवळपास ‘एवढे’ नागरिक युक्रेनमध्ये अडकले, पाहा कोणत्या राज्यातील किती नागरिक?

▪️साधारणत: सरळ वाढणाऱ्या निलगिरीच्या या झाडांपासून लाकूड विकणे, लाकडाचा वापर पेटी, इंधन, हार्ड बोर्ड, लगदा, फर्निचर, पार्टिकल बोर्ड आणि इमारती तयार करण्यासाठी केला जातो.

Advertisement

▪️ कोणत्याही हंगामात, जमिनीवर व हवामानात निलगिरीची झाडे वाढतात. कोणत्याही जमिनीवर त्यांची उंची 30 ते 90 मीटर पर्यंत असू शकते. निलगिरीची झाडे पूर्णपणे वाढून परिपक्व होण्यासाठी 8 ते 10 वर्षे जातात.

▪️भारतात असणाऱ्या सहा निलगिरीच्या प्रजाती: निलगिरी नायटेन्स, युकॅलिप्टस ऑब्लिक्वा, युकॅलिप्टस विमिनालिस, युकॅलिप्टस डेलेगेटेन्सिस, युकॅलिप्टस ग्लोबुलस आणि युकॅलिप्टस डायव्हर्सिकलर.

Advertisement

▪️जमिनीवर सपाटीकरण करून खोल नांगरणी करा. सपाट शेतात रोपे लावण्यासाठी छोटे खड्डे तयार केले जातात. या भागांमध्ये शेणखत टाकून जे सिंचन करतात. त्याची झाडे 5 फूट अंतरावर वाढतात.

▪️नीलगिरीची रोपे रोपवाटिकेत तयार केली जातात आणि नंतर शेतात रोपण केली जातात. या झाडाची रोपे लावण्यासाठी पावसाळा ऋतू उत्तम असतो किंवा इतर ऋतूत रोपे लावल्यानंतर लगेच प्रथम पाणी देणे आवश्यक आहे.

Advertisement

▪️ निलगिरीच्या झाडांना 40 ते 50 दिवसांच्या अंतराने पाणी लागते. ऐन जोमात असताना, निलगिरीची झाडे तणांपासून संरक्षित करावी लागतात. विशेषतः पावसाळ्यात झाडांना 3 ते 4 खुरपणी आणि झाडाभोवतीची तण उपटून नष्ट करण्याची गरज भासते.

भारतातील जवळपास ‘एवढे’ नागरिक युक्रेनमध्ये अडकले, पाहा कोणत्या राज्यातील किती नागरिक?

निलगिरी लागवडीसाठी खर्च किती आणि फायदा कसा?

Advertisement

निलगिरी हे सहज वाढणारे झाड असून ज्यावर जास्त लक्ष देण्याची गरज नसते. त्याची 1 हेक्टरमध्ये सुमारे 3000 हजार रोपे लावता येतात. ही रोपे नर्सरीतून 5 ते 7 रुपयांस तुम्हाला विकत मिळून जातील. असे करून रोपांची एकूण किंमत सुमारे रु. 21 हजार होईल. अनेक छोटे-मोठे खर्च धरून एकूण उत्पादन खर्च सुमारे 25,000 रुपयांपर्यंत येऊ शकतो. 4 ते 5 वर्षांनी प्रत्येक झाडापासून सुमारे 400 किलो लाकूड मिळू शकते. म्हणजे 3000 झाडांपासून सुमारे 12,00,000 किलो लाकूड मिळेल.

निलगिरीचे लाकूड बाजारात कमीत कमी 6 रुपये किलो दराने विकले जाते, अशावेळी तुम्ही ते विकले तर तुम्हाला सुमारे रु. 72 लाखाची कमाई कराल. यातून होणारा इतर काही खर्च (जमीन भाडे, देखभाल खर्च इ.) वजा केले तरीही, तुम्ही 4 ते 5 वर्षाच्या या कालावधीत किमान 60 लाख रुपये कमावू शकता. या लाकडापासून तुम्हाला काय करायचं आहे, ते कसं आणि कुठे जास्त पैसे मिळवून देईल हा विचार करून योग्य ठिकाणी ते विका अथवा कंपन्यांना विका. असा हा शेतीतून बिझनेससारखा पैसा तुम्ही कमवू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement