SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अ‍ॅमेझॉनच्या धमाकेदार सेलला सुरुवात, फ्रीज, पंखे, एसीवर मिळणार ‘एवढी’ सूट..

ई-कॉमर्स म्हटलं की हिवाळा असो की पावसाळा सेल सुरू होण्याला फक्त निमित्त! आता जगातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (E-Commerce Compony Amazon) ने एक दिवसापूर्वी नवीन सेलची घोषणा करत सुरुवात केली आहे. यंदा भरपूर सूट देण्यासोबतच बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही कमी केल्या आहेत.

अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये काय-काय?

Advertisement

अ‍ॅमेझॉनच्या या जबरदस्त सेलमध्ये (Amazon Summer Sale) उन्हाळ्यासाठी लागणाऱ्या, उन्हाळ्यातील गर्मीमुळे लोक आराम पडावा किंवा थंडावा मिळावा अशा वस्तू खरेदी करत असतात. अशा वस्तूंच्या खरेदीला आता ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुरुवात झाली आहे. उन्हाळयात लागणाऱ्या वस्तू , घरगुती उपकरणांवर ही कंपनी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा डिस्काउंट देणार आहे.

सकाळी उठल्यानंतर अनोशीपोटी तूप खा; होतील ‘हे’ फायदे…

काल दि. 25 फेब्रुवारीपासून सुरु झालेला हा धमाकेदार ‘Summer Appliances Carnival 2022’ सेल 4 दिवस असणार आहे. या 4 दिवसांमध्ये ग्राहकांना नवीन ऑफर्ससहित उन्हाळ्यातील थंडावा देणाऱ्या वस्तू खरेदी करता येणार आहे. हा सेल 28 फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहे.

Advertisement

जर तुम्हालाही काही खरेदी करायचं असेल, तर अ‍ॅमेझॉन वेबसाईटवर 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान हा सेल सुरु राहील. या सेलमध्ये एसी, फ्रिज आणि कूलर्स असे उन्हाळ्यात उपयोगी ठरणारी उपकरणं स्वस्तात मिळतील. तर मायक्रोवेव्ह ओव्हन, किचन चिम्नी आणि डिशवॉशर सारखे इलेक्ट्रॉनिक्स देखील डिस्काउंटसह उपलब्ध होतील.

अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये 5 हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यास तुम्हाला तगड्या ऑफर्स मिळणार आहेत. तसेच यात स्प्लिट एसीची किंमत 22,499 रुपयांपासून सुरु होतेय, तर कन्व्हर्टिबल एसी 33,490 रुपयांपासून उपलब्ध होतील. या सेलमध्ये एलजी, सॅमसंग, लॉयड, ब्लू स्टार आणि पॅनासॉनिक सारख्या लोकप्रिय ब्रँड्सचा समावेश असेल. तुम्हाला 18 महिन्यांच्या मर्यादेपर्यंत नो-कोस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल.

Advertisement

अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये रेफ्रिजरेटर्सची किंमत 13,990 रुपयांपासून सुरु होत असून लोकप्रिय ब्रँड्सवर 24 महिने नो-कोस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल. जुना फ्रिज एक्सचेंज करून 12 हजार रुपयांपर्यंतची बचत करता येणार आहे. सेलमध्ये पंख्यांवर 30 टक्क्यांपर्यंत तर कूलर्सवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

(ई-कॉमर्स वेबसाईटवर खरेदी करताना वस्तूंची किंमत, सूट यामध्ये कमी-अधिक बदल होऊ शकतो आणि उपलब्ध स्टॉक कधीही संपू शकतो, हे लक्षात घ्यावे.)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement