SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गाडीचा टायर आता पंक्चरच होणार नाही.., ‘या’ प्रसिद्ध कंपनीने बनवले ‘पंक्चर प्रूफ’ टायर.. पाहा व्हिडीओ..

गाडी पंक्चर झाल्यामुळे होणारा मनस्ताप आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला असेल.. घाईच्या कामात जर मध्येच गाडीचा टायर पंक्चर झाला, तर काय अवस्था होते, हे सांगायला नको. दूरच्या पर्यटनाला गेल्यावर असा प्रकार झाल्यास फिरण्याची सगळी मजाच निघुन जाते..

एका आकडेवारीनुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 200 दशलक्ष टायर वेळेपूर्वी पंक्चर होतात. रस्त्यावर पडलेल्या टोकदार वस्तूंमुळे किंवा अयोग्य हवेच्या दाबामुळे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण मोठे आहे.. मात्र, आता येणाऱ्या काळात टायर पंक्चर होण्याची समस्याच राहणार नाही.. वाचून आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरंय…

Advertisement

पुढच्या काही वर्षात तुमच्या गाडीचे टायर पंक्चरच होणार नाहीत.. म्हणजे रस्ते चांगले होत आहेत, असं नाही.. तर ‘पंक्चर प्रुफ’ टायर लवकरच बाजारात दिसणार आहेत.. टायर उत्पादक कंपनी ‘मिशलिन’ अशा टायरवर काम करीत आहे. ‘शेवरले’ (Chevrolet)च्या ‘बोल्ट’ इलेक्ट्रिक कारसाठी ‘मिशलिन’ कंपनी पंक्चर प्रूफ टायर तयार करीत आहे.

Advertisement

या टायरची रचनाच अशी असेल, की ते पंक्चरच होणार आहे. येत्या तीन-चार वर्षात ‘मिशलिन’ कंपनी या टायरचे व्यावसायिक उत्पादन सुरु करणार आहे. ‘पंक्चर प्रूफ सिस्टीम’मुळे दरवर्षी टायर फाटणे, फुटण्याचे प्रमाण कमी होईल.. टायर निर्मिती आणि दोषपूर्ण टायर्सची विल्हेवाट लावण्यासाठी ऊर्जा नि पैशांची बचत होणार असल्याचे सांगण्यात येते..

‘मिशेलिन’ टायर्सचे वैशिष्ट्ये
‘मिशेलिन’ने 2019 मध्ये त्यांचे ‘एअरलेस टायर अप्टिस’ लाँच केले असले, तरी त्याची निर्मिती प्रक्रिया एका दशकाहून अधिक काळ सुरू होती.
– मिशेलिन अप्टिस बेल्ट आणि स्पोकचे बनलेले आहे.
– या टायरची वाहनाचे वजन वाहून नेण्याची क्षमता चांगली असून, अनेक पातळ नि मजबूत फायबर ग्लास वापरून ते बनवले आहे.

Advertisement

गेल्या वर्षी 2021 मध्ये प्रायोगिक तत्वावर मिशेलिन एअरलेस टायरसह ‘मिनी कूपर एसई’ रस्त्यावर धावली होती. ‘मिशेलिन’ने त्याच्या पंक्चर-प्रूफ टायर तंत्रज्ञानासाठी 50 पेटंटही दाखल केले आहेत. अप्टिस टायर्समुळे गाडी चालवताना टायर अचानक पंक्चर होऊन हवेचा दाब कमी होण्याचा धोका नसल्याचे मिशेलिन उत्तर अमेरिकेचे अध्यक्ष अ‍ॅलेक्सिस गार्सिन यांनी सांगितले..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement