SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुष्पा भाऊची धम्माल, रविंद्र जडेजाची कमाल! विकेट घेताच दाढीवर हात फिरवत म्हणाला…

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sril lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या T-20 मालिकेतील पहिला सामन्यात भारताने काल लखनौमध्ये 62 धावांनी विजय मिळवला आहे. काल झालेल्या पहिल्या T20 मध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर ईशान किशन व रोहित शर्मा यांच्या जोडीने श्रीलंकन गोलंदाजांवर चांगलंच आक्रमण केलं.

ईशान किशनच्या वेगवान 89 धावा, कर्णधार रोहित शर्माच्या 44 धावा आणि श्रेयस अय्यरच्या 28 चेंडूत 57 धावांच्या जोरावर भारताने 199 धावांचा डोंगर उभारला, तर श्रीलंकेला 20 षटकात फक्त 137 धावा करता आल्या. टीम इंडियामध्ये दुखापतीमुळे बाहेर असलेल्या रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) तीन महिन्यांनंतर कमबॅक झाल्यानंतर त्याने आपला जलवा दाखवायला सुरूवात केल्याचं पाहायला मिळालं.

Advertisement

श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेची सलामी जोडी तंबुत धाडली. श्रीलंकेचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना कर्णधार रोहितने रविंद्र जडेजाला गोलंदाजीला बोलावलं. त्यावेळी श्रीलंकेच्या 3 विकेट पडल्या होत्या. 9 षटकात श्रीलंकेला फक्त 51 धावा करता आल्या होत्या.

रशियन हल्ल्याबाबत युक्रेनच्या राजदूतांचे PM मोदींना मदतीचे आवाहन;
भारताने या देशांना मदत करावी का? तुम्हाला काय वाटते? तुमचे मत मांडा…

Advertisement

9 व्या षटकात जडेजा आपलं दुसरं षटक घेऊन आला. त्यावेळी जडेजाने टाकलेल्या एका शाॅर्ट लेन्थ बाॅलवर चांदिमल खेळण्यासाठी पुढे आला. त्यावेळी त्याला समोरून आलेला बाॅल हुलकावणी देत विकेटकिपर ईशानच्या ग्लोव्हजमध्ये गेला. ईशानने बाॅल पकडल्यानंतर चांदिमलला आउट केलं. त्यावेळी जडेजाने पुष्पा चित्रपटातील दाढीखालून हात फिरवत इशारा (Ravindra Jadeja in Pushpa Style) केला. अर्थातच, “मै झुकेगा नही”, असं इशाऱ्याने Pushpa: The Rise चित्रपटात दाखवल्याप्रमाणे बोलत होता.

असे होते दोन्ही संघ:

Advertisement

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल, दिपक हुड्डा

श्रीलंका: पथुम निसांका, कमील मिशारा, चरिथ असलंका, दिनेश चंडीमल, जनिथ लियानगे, दासुन शनाका, चामिका करुणारत्ने, जेफरी व्हॅनडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंता चमीरा, लहिरू कुमारा
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement