SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आयपीएल’मधील 10 संघांची दोन गटात विभागणी, लिगच्या फॉर्मेटमध्येही मोठे बदल..!

क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ‘बीसीसीआय’ (BCCI) ने आज ‘आयपीएल’चे (IPL 2022) शेड्यूल जाहीर केलं. त्यानुसार, यंदाचा ‘आयपीएल’चा 15 वा सीजन 26 मार्चपासून सुरु होणार आहे, तर ‘आयपीएल’ची फायनल मॅच 29 मे रोजी खेळवली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

कट्टर प्रतिस्पर्धी असणारे MI आणि CSK यंदा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?

Advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएलचे सगळे सामने पुण्या-मुंबईत खेळविले जाणार आहेत. मुंबई व पुण्यातील चार मैदानांवर एकूण 70 साखळी सामने होणार आहेत. प्ले-ऑफ सामन्यांचा निर्णय नंतर घेतला जाणार असल्याची माहिती ‘आयपीएल’चे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली.

यंदा ‘गुजरात टायटन्स’ व ‘लखनऊ सुपर जायंटस्’ या दोन संघाचा समावेश झाल्याने एकून संघाची संख्या 8 ऐवजी 10 झाली आहे. त्यामुळे यंदा लिगच्या फॉर्मेटमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत.

Advertisement

यंदाची ‘आयपीएल’ टीम्समध्ये यंदा रॉबिन राऊंड पद्धतीने सामने होणार नाहीत. 10 संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक गटात 5 संघाचा समावेश असणार आहे. प्रत्येक संघाला 9 संघांविरुद्ध सामना खेळायचा आहे. ग्रुपच्या विभागाणीसाठी ‘बीसीसीआय’ने खास पद्धत अवलंबली आहे.

कट्टर प्रतिस्पर्धी असणारे MI आणि CSK यंदा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?

Advertisement

अशी झाली संघांची ग्रुपमध्ये विभागणी
– ‘आयपीएल’मधील आधीच्या 8 संघांनी किती वेळा जेतेपद मिळवले, किती वेळा संघ फायनलमध्ये पोहोचले, या आधारावर ‘बीसीसीआय’ने सर्व संघांची दोन ग्रुपमध्ये विभागणी केली.
– ‘मुंबई इंडियन्स’ने सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद मिळवले आहे. नंतर ‘चेन्नई सुपर किंग्ज’ 4 वेळा विजेते झाले असल्याने या दोन्ही संघांना वेगवगेळ्या गटांमध्ये ठेवण्यात आलं..

– कोलकाता, हैदराबाद व राजस्थान संघांसाठीही हाच नियम लावण्यात आला. हैदराबादने दोन फायनल सामने खेळले आहेत. त्यासाठी यादीत त्यांना राजस्थान संघाच्या वर स्थान दिलं आहे.
– नंतर दिल्ली-पंजाबचा संघ प्रत्येकी एकदा फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे या संघांना ‘अल्फाबेटिकल ऑर्डर’प्रमाणे अक्षराच्या आधारे स्थान देण्यात आलं.
– लखनऊ व गुजरातच्या बाबतीत किंमतीचा आधार मानले आहे.

Advertisement

प्रत्येक संघ 14 सामने खेळणार
‘आयपीएल’मधील 10 संघ प्रत्येकी 14 लीग सामने खेळतील. साखळी फेरीत 70 सामने, नंतर 4 प्ले-ऑफ सामने होतील. सर्व संघ 5 संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. उर्वरित 4 संघांविरुद्ध एक सामना खेळणार असल्याचे सांगण्यात आले..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement