SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनला आता ‘या’ गोष्टींसाठी जबाबदार धरता येणार नाही..

सोशल मीडिया अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप हे (WhatsApp) व्यक्तिगत मेसेजसोबतच ग्रुपवर चॅट करण्यासाठी वापरतात.
व्हॉट्सअ‍ॅपवर आपण आपल्या मित्रांना फोटो, व्हिडीओ आणि माहिती शेअर करतो. येथे आपले ठराविक ग्रुप देखील असतात. ज्यावर आपण त्या त्या संदर्भाबाबत माहिती शेअर करत असतो. तेव्हा अनेकदा ग्रुपवरील मेसेजवरून वाद होत असतात. यानंतर या मेसेजसाठी पोलिसांकडूनही अनेकदा ग्रुप अ‍ॅडमिनला (WhatsApp Group Admin) जबाबदार धरलं जातं, मात्र, केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

रशिया विरुद्ध युक्रेन; कोणता देश किती शक्तिशाली; पाहा कोणाकडे किती सैन्य..!!

केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयात काय म्हटलंय?

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅपवर जर कोणतेही संवेदनशील किंवा ज्यामुळे वाद होतील असे मेसेज पाठवल्याप्रकरणी, ग्रुपमधील इतर सदस्यांनी केलेल्या पोस्टसाठी अ‍ॅडमीनला जबाबदार धरले जाईल, या प्रकारची तरतूद असणारा कसलाही कायदा अस्तित्वात नाही. माहिती आणि प्रसारण कायद्यानुसार अ‍ॅडमीन हा मध्यस्थ ठरत नाही, असं न्यायालयाने म्हटलंय.

अ‍ॅडमीनकडे मेसेज पुढे पाठवण्यासाठी येत नाही आणि तो पाठवत नाही. ग्रुपचे सदस्य आणि अ‍ॅडमीन यांच्यात तसा संबंध नाही आहे. त्यामुळे ग्रुपमधील बाकी सदस्यांच्या मेसेजसाठी अ‍ॅडमीनला जबाबदार धरणे गुन्हेगारी कायद्याच्या मुलभूत सिद्धांताच्या विरोधात आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Advertisement

केरळ उच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणी वेळी मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांचाही संदर्भ दिला. तसेच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीनला इतर सदस्यांपेक्षा वेगळा अधिकार म्हणून केवळ सदस्यांना अ‍ॅड करणे किंवा रिमुव्ह करणे इतकाच अधिकार असतो. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीनकडे ग्रुपमधील सदस्यांनी काय मेसेज करावे याचे कोणतेही नियंत्रण नसते.

केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांच्या खंडपीठापुढे मार्च 2020 मधील एक प्रकरण सुनावणीसाठी पुढे आले होते. त्या प्रकरणातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या ऍडमिनविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि पोक्‍सो कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार निकाल देताना त्यांनी हा निर्णय दिला. म्हणून इतर सदस्यांनी पोस्ट केलेल्या आक्षेपार्ह मेसेजसाठी जबाबदार धरता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement