SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय कमाॅडिटी बाजारात भडका, आज सोने-चांदी किती रुपयांनी स्वस्त..?

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे जगभरातील चिंता वाढली आहे. क्रूड ऑईलचे दर वाढले आहेत. यामुळे इंधनाचे दरही भारतात वाढू शकतात. आता सध्या अनिश्चिततेचा नफेखोरांनी गैरफायदा घेण्याचे अनुभव आज कमॉडिटी बाजारात आला. सोने-चांदीच्या दरातही (Gold-Silver Price Today) मोठा बदल दिसून आला.

रशिया विरुद्ध युक्रेन; कोणता देश किती शक्तिशाली; पाहा कोणाकडे किती सैन्य..!!

आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सकाळी मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोन्याचा भाव जवळपास 600 रुपयांनी घसरला, तर चांदीच्या दरातही तब्बल 1200 रुपयांची घसरण झाली.

Advertisement

रशियाने युक्रेनमध्ये आपली लष्करी कारवाई सुरू करत अनेक शहरांत स्फोट घडवून आणले आहेत. रशियाने युद्धाची सुरुवात युक्रेनच्या चारही बाजूने करत आता युक्रेनच्या शहरांमध्ये सैन्य घुसवले आहेत आणि एअरबेस व काही ठिकाणी मिसाईल हल्लेही रशियाने केले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सध्या कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. या पार्श्वभूमीवर जगभरातील भांडवली आणि कमॉडिटी बाजारात गुरुवारी मोठी उलथापालथ दिसून आली होती.

जागतिक घडामोडी घडत असताना याचा परिणाम भारतासोबत अनेक देशांत होणार आहे. कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव थेट 2150 डॉलर प्रती औंस इतका वाढला होता. त्याचे परिणाम भारतालाही सोसावे लागणार आहे. भारतीय कमॉडिटी बाजारात सोन्याचे भाव 51,500 रुपये झाले. गुरुवारी कमाॅडिटी बाजारात सोन्याचा भाव तब्बल 1400 रुपयांनी वाढला होता. आज मात्र अचानक त्यात मोठी विक्री झाल्याचे दिसून आले.

Advertisement

नफेखोरांची सोन्याच्या वाढत्या भावामुळे जबरदस्त नफा वसुली झाली. ज्यामुळे सोन्याचा भाव थोडासा खाली आला. आता सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,919 इतका असून त्यात 624 रुपयाची घसरण आली आहे, तर यासोबतच चांदीचा भाव 65, 681 रुपये किलो इतका होऊन त्यात 1217 रुपयांची घसरण झालीय.

गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी..

Advertisement

▪️ मुंबईत प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,850 रुपये इतका आहे. त्यात गुरुवारच्या तुलनेत 400 रुपयांची घसरण, आज 24 कॅरेटचा भाव 51,110 रुपये इतका झाला आहे.

▪️ आज दिल्लीत सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 47260 रुपये इतका आहे. दिल्लीत 24 कॅरेटचा सोन्याचा भाव 51,110 रुपये आहे.

Advertisement

▪️ चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 48,010 रुपये इतका असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,370 रुपये इतका आहे. त्यात 1600 रुपयांची घसरण झाली.

▪️ कोलकात्यात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,850 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,110 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement