SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बहुचर्चित ‘झुंड’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, नागराज मंजुळे आर्ची-परश्यासोबत पुन्हा ती कमाल साधणार का? बघा ट्रेलर..

देशभरात ‘सैराट’ या चित्रपटातून अनेकांची मने जिंकणारी जोडी अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा अभिनय दिसून आला आहे.

बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांची चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे. ‘झुंड’ चित्रपटाचा ट्रेलर (Jhund Movie Trailor) प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर हा 3 मिनिटे 2 सेकंदाचा असून तो तुफान व्हायरल होत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याला अवघ्या अर्ध्या तासात तब्बल एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Advertisement

अमिताभ बच्चन हे या चित्रपटात निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे व त्यांच्या टीमच्या संघर्षाची कहाणी ‘झुंड’ मध्ये पाहायला मिळणार आहे. सोनसाखळी चोरणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या काही मुलांची टीम ते बनवू पाहण्याचं स्वप्न विजय पाहत असतात. मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलांना कॉलेज कॅम्पसमध्ये आणण्याला अनेकांचा विरोध असतो. अशा मुलांचं आयुष्य ते कशा पद्धतीने बदलतात हे सर्व या चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement

आगामी ‘झुंड’ या चित्रपटाला अजय-अतुल या जोडीने संगीत दिले आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता बघायला मिळतेय. ‘झुंड’ हा चित्रपट येत्या 4 मार्चला मोठ्या पडद्यावर अर्थात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. झुंड चित्रपटातील मुलांची टोळकीसुद्धा प्रेक्षकांच्या मनात विशेष छाप सोडेल, अशी शक्यता ट्रेलर पाहिल्यावर निर्माण होते. फँड्री चित्रपटातील जब्या आणि त्याचा बाबा म्हणजेच सोमनाथ अवघडे आणि किशोर कदम हे देखील चित्रपटात दिसून येणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement