SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फाटलेल्या नोटा बदलून मिळतात.. ‘आरबीआय’ने केले नवीन नियम जाहीर..!

बऱ्याचदा आपल्याकडून नोटा भिजतात, खराब होतात नि फाटतात. त्यावर काही जण चिकटपट्टी लावून ती नोट बाजारात कशीतरी खपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ही बाब लक्षात आल्यास दुकानदारही अशा फाटक्या नोटा स्वीकारत नाहीत. अनेकदा नोट फेकून देण्याची वेळ येते..

तुमच्याकडे एखादी फाटलेली नोट आली असेल, त्यावर सेलोटेप चिकटवलेला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही.. तुम्हाला तुमच्या जुन्या नोटांच्या बदल्यात अगदी त्याच रकमेच्या नव्या नोटा बदलून मिळतात. त्यासाठी ‘आरबीआय’ने (Reserve bank of India) काही नियम बनवले आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

Advertisement

नियम काय सांगतो..?
2017 मधील टएक्सचेंज करन्सी नोट’ नियमानुसार ‘एटीएम’मधून फाटलेली, सेलोटेप चिटकवलेली नोट मिळाल्यास, त्या तुम्ही सहज सरकारी बॅंकांमधून बदलून घेऊ शकता. सरकारी बँकांना त्याला नकार देऊ शकत नाही..

अशी बदला फाटकी नोट..
‘आरबीआय’च्या अधिकृत ऑफिसमध्ये जाऊन तेथे फाटक्या नोटा बदलून घेण्यासाठीचा फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म भरल्यावर सहकारी बँक, खासगी बँक किंवा एखाद्या करन्सी चेस्ट, तसेच ‘आरबीआय’च्या अधिकृत ऑफिसमधून तुम्ही या नोटा बदलू शकता.

Advertisement

किती पैसे मिळतात..?
तुमच्या फाटलेल्या नोटेवर तुम्हाला किती पैसे मिळणार, हे ठरते.. तुमची नोट थोडीफार फाटलेली असेल, तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतात. मात्र, नोटेची स्थिती खूपच खराब झालेली असेल, तर अशा वेळी नोटेचे मूल्यांकन करुन त्यानुसार पैसे दिले जातात.

सरकारी बॅंका तुम्हाला नोट बदलून देण्यास नकार देऊ शकत नाहीत. मात्र, बॅंकेने तसे केल्यास तुम्हाला संबंधित बॅंकेची तक्रार करता येते.. अशा वेळी तुम्ही ‘एसबीआय’ बॅंकेसाठी  https://crcf.sbi.co.in/ccf/ under General Banking// Cash Related category या वेबसाईटवर तक्रार करू शकता. तुमच्या तक्रारीनंतर बँक अधिकाऱ्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते. बँकेला 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement