SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रविंद्र जडेजाची टीम इंडियात एंट्री, आज भारताचा श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 सामना..

भारत आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या T-20 मालिकेतील पहिला सामना आज लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर 26 आणि 27 फेब्रुवारीला उर्वरित दोन सामने होणार आहेत. पहिल्या T20 मध्ये भारतीय संघात काही बदल झाले आहेत. ते जाणून घेऊयात..

सर जडेजा करणार कमबॅक…?

Advertisement

भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) संघात पुनरागमन झाले आहे. तीन महिन्यांनंतर तो संघात परतला. त्याच वेळी, दीपक चहर आणि सूर्यकुमार यादव मालिकेच्या आधी जखमी झाले आहेत.

संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष लागून असलेल्या IPL यंदा महाराष्ट्रात होण्याची शक्यता; कुठे होणार सामने पाहा

सूर्यकुमार यादव, दीपक चहर, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्या अनुपस्थितीत आता कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सूर्यकुमार यादव बाहेर पडल्यास संजू सॅमसनला इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.

Advertisement

युवा अष्टपैलू व्यंकटेश अय्यर चांगली कामगिरी करत आहे सूर्यकुमार बाहेर पडल्याने व्यंकटेशची जागा पूर्णपणे सुरक्षित मानली जाते. आजच्या सामन्यात बुमराहची सुद्धा एंट्री होण्याची दाट शक्यता आहे. आता श्रीलंकेविरुद्ध कॅप्टन रोहित शर्मा कोणाची वर्णी लावतो हे पाहायचे आहे.

रशियाकडून अखेरीस युद्धाची घोषणा; या युद्धाने भारतावर झाला असा परिणाम

यासह भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल वेगवान गोलंदाजीची कमान सांभाळतील. फलंदाजीबद्दल म्हणायचं झालं तर या सामन्यात रोहित शर्मा ऋतुराज गायकवाड सोबत सलामीस उतरू शकतो, तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. बीसीसीआयनेही रवींद्र जडेजाच्या पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त करतानाचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, संघात परत आल्याने तो खूप आनंदी आहे आणि आता त्याला आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

Advertisement

भारताची संभाव्य टीम:

रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement