फेसबुक म्हणजे कोणाचा टाईमपास तर कोणाचा मन मोकळं करण्याचा प्लॅटफॉर्म आहे. सध्या फेसबुकचं फेसबुक रिल्स (Facebook Reels) हे फिचर आता आजपर्यंत 150 देशांमध्ये लाँच झालं आहे. आता यामधून लोकांना पैसे कमविण्याची संधीही देण्यात येणार आहे.
फेसबुकने टिकटॉकला टक्कर देण्यासाठी कंपनीनं या आकर्षक फिचरची सुरुवात 2020 साली केली होती. मेटाचे सीईओ मार्क जुकरबर्ग (Mark Zukerburg, CEO of Meta) यांनी फेसबुक युजर्सपैकी रील क्रिएटर्सना पैसे कमवण्याची संधी देणार असल्याचं म्हटलंय. त्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्ससाठी Reels Play प्रोग्राम सुरु करण्यात आला असल्याची माहीती आहे.
रील्सवर पैसे मिळणार, पण कसे?
यंदा मार्च एंडिंगला ‘हॉलिडे फिवर; तब्बल इतक्या दिवस राहणार बंद..!!
▪️ फेसबुकवरील ज्या रील्स क्रिएटर्सने समजा कमीत कमी 30 दिवसांच्या आतमध्ये त्यांच्या रिल्सवर कमीत कमी 1000 व्ह्यूज मिळवले असतील, तर अशा क्रिएटर्सना फेसबुककडून बोनस मिळणार आहे.
▪️ रिल्स प्ले बोनस प्रोग्राम (Reels Play Bonus Program) कंपनीच्या 1 बिलियन डॉलर क्रिएटर्स इन्व्हेस्टमेंटमधील एक भाग आहे.
▪️ कंपनीच्या या प्रोग्रामच्या माध्यमातून रिल्स क्रिएटर्सना महिन्याला जास्तीत जास्त 35,000 डॉलर (सुमारे जवळपास 2611,514 रुपये) ची कमाई करता येईल.
▪️ फक्त कंपनी जे रिल्स कमाईसाठी पात्र असतील, अशा रिल्सच्या व्ह्यूजवर कमाई देणार आहे.
▪️ संपूर्ण माहीतीसाठी क्लिक करा 👉https://about.fb.com/news/2022/02/launching-facebook-reels-globally/
जगातील प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरील पोस्ट केलेल्या रिल्सवर काही बॅनर्सच्या स्वरूपात तर काही स्टीकर्सच्या स्वरूपात जाहिराती दाखवण्यात येतील. या जाहिरातींमधून फेसबुकला पैसे मिळतील. मग या कमाईचा काही भाग फेसबुक आपल्या क्रिएटर्सना देणार आहे. क्रिएटर्सना रिल्स पोस्ट करण्यात मदत व्हावी म्हणून एडिटिंग, शेयरिंगसह व्हिडीओ रीमिक्स करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय ड्राफ्ट ऑप्शन आणि ड्रॉफ्ट सेव्ह बटन मिळेल. फेसबुक रीलमध्ये 60 सेकंदाचे छोटे व्हिडीओ बनवता येतील. याप्रकारे रिल्स करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit