SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इटलीतील लक्झरी इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच भारतात, ‘ओला’-‘अथेर’ला जोरदार टक्कर..!

गेल्या काही दिवसांत इंधनाच्या किंमती गगणाला भिडल्याने नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन विविध कंपन्यांनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपल्या गाड्या लाॅंच केल्या आहेत. त्यात आता आणखी एका कंपनीची भर पडणार आहे… त्यामुळे ‘ओला’- ‘अथेर’ या इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार टक्कर मिळणार आहे..

‘पियाजिओ’ (Piaggio) या इटालियन ऑटो कंपनीची दमदार स्कूटर ब्रँड वेस्पा (Vespa) लवकरच भारतात लाॅंच केली जाणार आहे. अर्थात त्याची तारीख अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही. ‘रेट्रो-एस्थेटिक’ डिझाइनमुळे इटलीमधील ही ‘वेस्पा’ लक्झरी स्कूटर ब्रँड म्हणून ओळखली जाते. या कंपनीची आता इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल होणार आहे..

Advertisement

याबाबत ‘पियाजिओ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक डिएगो ग्राफी (Diego Graffi) यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की ‘पियाजिओ’ कंपनी भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लाॅंच करणार आहे. भारतात अशी ‘ईव्ही इकोसिस्टम’ तयार करायची आहे, जी ‘सबसिडी’शिवायही टिकू शकेल. भारत सरकारने भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची ‘सबसिडी’ बंद केली, तरी आत्मनिर्भर राहता येईल..”

‘पियाजिओ’ कंपनी आणखी एक स्पोर्टी ब्रँड ‘एप्रिलिया’ (Aprilia) देखील आणू शकते, असे सांगून ते म्हणाले, की “आम्ही फक्त एंट्री म्हणून भारतीय मार्केटमध्ये प्रवेश करू इच्छित नाही. आमच्याकडे पॉवरट्रेन असेल, जी आमच्या ‘स्पेसिफिकेशन’वर आधारित असेल. आम्हाला शेल्फमधून काहीही काढायचे नसल्याने जास्त वेळ लागत आहे…”

Advertisement

दरम्यान, ‘पियाजिओ’ कंपनी भारतात तीन चाकी रिक्षा बनवते, तर इटलीमध्ये ‘वेस्पा’ व ‘एप्रिलिया’ ब्रँड्सच्या दुचाकी तयार केल्या जातात.. वेस्पा ब्रँड अंतर्गत ही कंपनी आता भारतात इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.

‘पियाजिओ’ कंपनीने यापूर्वी ‘ऑटो एक्स्पो-2020’ मध्ये ‘वेस्पा’ इलेक्ट्रिक स्कूटरचे प्रदर्शन केले होते. कंपनी या स्कूटरचे ‘अपडेटेड व्हर्जन’ भारतातही लॉन्च करू शकते. या स्कूटरची खास वैशिष्ट्ये जाणून घेऊ या..

Advertisement

‘वेस्पा’ची वैशिष्ट्ये

  • एका चार्जवर 100 किलोमीटरपर्यंतची रेंज
  • बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी चार तास लागतात.
  • या इलेक्ट्रिक स्कूटरला 4KWची इलेक्ट्रिक मोटर दिली जाईल, जी 5.36 हॉर्स पॉवरचा पीक पॉवर आणि 20 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करील.

किंमत किती असणार..?
इलेक्ट्रिक स्कूटर असल्याने ‘वेस्पा इलेक्ट्रिका’ (Vespa Electrica)ची किंमत थोडी जास्त असणार आहे. भारतीय बाजारात या स्कूटरची किंमत जवळपास 90 हजार रुपये असू शकते, असे सांगण्यात आले.

Advertisement

 

Advertisement