SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. तुमच्या शब्दांची जादू तुम्ही सामाजिक स्तरावर पसरवू शकता.

वृषभ (Taurus): जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल. आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून गैरसमज करून घेऊ नका. आयात-निर्यात व्यवसाय केल्यास नफा मिळण्याची शक्यता आहे. नम्रता अंगी बाळगा म्हणजे तोटा होणार नाही.

मिथुन (Gemini) : मुलांना यश मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. नोकरीत गुप्त शत्रूपासून सावध राहा. प्रवासात दगदग होईल. व्यवहार करताना काळजी घ्यावी. काही वस्तूंवर पैसे खर्च करावे लागू शकतात. आज ज्यूस पिण्याची इच्छा होईल.

कर्क (Cancer) : महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. धन वृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. मिळकतीच्या तुलनेत खर्च जास्त राहील. नवीन विषयांचा अभ्यास करू शकतात. एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीला भेटून ट्रीपला जाण्याचे नियोजन आखाल.

सिंह (Leo) : अचानक प्रवासा करावा लागेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. बोलण्यामुळे मनाला शांती मिळेल. जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पुढे याल.

कन्या (Virgo) : आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न कराल. घरातील तणाव त्यामुळे कमी होईल. खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. कौटुंबिक जीवनात संमिश्र परिणाम मिळतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.

तुळ (Libra) : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. लोकांचे स्थान बदल देखील या दिवशी होऊ शकते. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

वृश्‍चिक (Scorpio) : जुगारसदृश व्यवहार टाळावेत. तब्येतीची काळजी घ्या. झोपेची तक्रार जाणवेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तारतम्य बाळगवे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. भांडणाला आवर घातला पाहिजे. भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. संपत्ती वाढू शकते.

धनु (Sagittarius) : तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल. सांसारिक सौख्यात वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल. जोडीदारावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. पैशाचा ओघ चांगला राहील. कौटुंबिक जीवनात संतुलन राहील.

मकर (Capricorn) : घरात जास्त वेळ देऊन घरातील सदस्यांशी संवाद साधला पाहिजे. अचानक उद्भवणाऱ्या खर्चावर आळा घालावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल. आज तुमच्या कानावर चांगल्या बातम्यांचा वर्षाव होणार आहे. वाहन विषयक कामे निघतील. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा.

कुंभ (Aquarious) : एखादी अनपेक्षित संधी किंवा प्रस्ताव समोर येईल. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे. तुमच्या कामगिरीवर सारे खुश राहतील. सामाजिक स्तरावर तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांची मने जिंकू शकता. कागदपत्रे वाचून मगच सही करा.

मीन (Pisces) : कामाचा व्याप वाढेल. काहींची तारांबळ उडू शकते. उगाच रागराग करू नका. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. बुद्धिबळासारखे बुद्धीचे खेळ खेळू शकता. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकेल. कामातील उत्साह वाढेल. तुम्हाला मात्र कामासाठी दगदग होईल. विचारपूर्वक पैसे खर्च करा. भागीदारीत व्यवसाय करणारे आज आनंदात राहतील. घरात मंगलकार्य शक्यता आहे.

Advertisement