SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ गायकाने अनेक भाषांमध्ये गायले श्रीवल्ली गाणे, पाहा हा जबरदस्त व्हिडीओ..

सोशल मीडियामुळे रोज काही ना काही व्हायरल होत असते. कुठे कॉमेडी व्हिडीओ तर कुठे गाण्यांचे व्हिडीओ हे सुसाट पसरत असतात. आता अनेक माध्यमांमुळे हे काम खूप सोपे झाले आहे. अशातच एका प्रतिभावान गायकाने गायलेल्या गाण्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर सध्या धुमाकूळ घालतोय.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल असलेल्या या व्हिडिओतील गायकाचा आवाज, आत्मविश्वास पाहून आपलाही उत्साह वाढेल. गाणे गात असताना आवाज ऐकून तुम्ही थक्क तर व्हाल, पण यापेक्षाही जास्त आश्चर्य तेव्हा वाटते, जेव्हा व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या सुंदर आवाजात पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाणे 1-2 नव्हे तर 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये (Pushpa-The Rise Movie Srivalli Song in 5 Languages) गाताना दिसत आहे.

ट्विटरवर व्हिडिओ होतोय शेअर

ट्विटरवर अनेक अशा गायकाला कुशल म्हणणार नाही तर दुसरं काय म्हणणार. लोक 1-2 भाषा शिकताना थकून जाता. या गायकाने एकूण 5 भाषांमध्ये गाणी गाऊन सर्वांची मने जिंकली आहेत. हे एवढं भाषाज्ञान आलं कुठून हेच सर्व जण विचार करत आहेत. तुम्हीही जेव्हा हे गाणे ऐकाल तेव्हा तुम्हाला ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटेल, कारण त्या व्यक्तीने हे गाणे खूप सुंदर गायले आहे आणि गायले आहे.

 

Advertisement

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘पुष्पा – TheRise चित्रपटातील श्रीवल्ली गाणे, 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये. प्रतिभावान गायकाची अप्रतिम कामगिरी.”, असं त्यांनी लिहिलं आहे. काहींना तेलुगू तर काहींना हिंदी व्हर्जन खूप आवडले आहे. हा व्हिडीओ 2 मिनिटे 20 सेकंदांचा असून प्रत्येक क्षणी लोकांच्या चेहऱ्यावरील उत्साह वाढवत आहे.

आतापर्यंत 2 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर भरपूर लोकांनी व्हिडिओला लाईक्सदेखील केले आहे. यासोबतच हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना गाण्याचे बोल जरी कळाले नसले तरी पण गाण्याचा आस्वाद घेत आहेत. काहीही म्हणा, गायकाने हे गाणे प्रत्येक भाषेत अतिशय सुंदर गायले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement