SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘पीएम केअर’ योजनेतून मुलांना मिळणार 10 लाख रुपये, नावनोंदणीसाठी सरकारकडून मुदतवाढ…!

कोरोना महामारीत अनेकांच्या डोक्यावरील छत्र हरपलं.. त्यात अनेक चिमुकली अनाथ झाली.. अशा अनाथ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोदी सरकारने गेल्या वर्षी एक योजना जाहीर केली होती. ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ (PM Cares for children Scheme).. असे या योजनेचे नाव..

या योजनेच्या लाभासाठी पात्र मुलांची नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीसाठी भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने यापूर्वी 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, आता त्यात वाढ करण्यात आली असून, आता या योजनेत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत नोंदणी करता येणार आहे..

Advertisement

याबाबत केंद्रीय मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रधान सचिव, महिला व बाल विकास, सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागांना पत्र लिहिले आहे. त्याची एक प्रत सर्व जिल्हा दंडाधिकारी/जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. योजनेतील पात्रतेचे निकष व लाभाबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

कोणाला मिळणार लाभ..?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 11 मार्च 2020 रोजी कोरोनाला जागतिक महामारी असल्याचे घोषित केले. त्या तारखेपासून 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत दोन्ही पालक किंवा एकमेव पालक गमावलेली मुले या योजनेसाठी पात्र आहेत. त्यात कायदेशीर पालक / दत्तक पालक / एकल दत्तक पालक यांचाही समावेश आहे. तसेच पालकांच्या मृत्यूच्या वेळी मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असायला हवे.

Advertisement

काय लाभ मिळणार..?
– ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ योजनेद्वारे सहाय्य रकमेसह शिक्षण आणि वैद्यकीय विम्याची सुविधा जाहीर करण्यात आली होती.
– कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांना वयाच्या 18 वर्षांपर्यंत मासिक स्टायपेंड मिळणार आहे..
– वयाच्या 23 व्या वर्षी या योजनेतील पात्र मुलांना ‘पीएम केअर फंडा’तून एकाच वेळी 10 लाख रुपये दिले जातील.
– या मुलांना केंद्र सरकार मोफत शिक्षण देईल, त्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज मिळेल आणि त्याचं व्याज ‘पीएम केअर फंडा’तून दिलं जाणार आहे..

इथे करा योजनेसाठी नोंदणी
– ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ योजनेच्या लाभासाठी https://pmcaresforchildren.in या ऑनलाइन पोर्टलवर 28 फेब्रुवारीपर्यंत मुलांची नोंदणी करता येईल..
– कोणताही नागरिक या योजनेअंतर्गत पात्र बालकाची माहिती या पोर्टलद्वारे प्रशासनाला देऊ शकतो.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement