SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतीय रेल्वेकडून क्रेडिट कार्ड लॉंच, स्वस्तात तिकीट बुकिंगपासून डिस्काऊंटपर्यंत मिळणार ‘हे’ फायदे..

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेच्या केटरिंग आणि तिकीट युनिट (IRCTC) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड (IRCTC Co-Branded Credit Card) लाँच केले आहे.

आयआरसीटीसी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड हे NPCI आणि BOB फायनान्शियल सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केले आहे. या क्रेडिट कार्डमुळे प्रवाशांना अनेक फायदे मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. दररोज 6 कोटींहून अधिक वापरकर्ते आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करतात.

Advertisement

आयआरसीटीसी अधिकार्‍यांनी सांगितले की, IRCTC BoB RuPay कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्डचा भारतीय रेल्वेत नेहमीच प्रवास करणार्‍या प्रवाशांना फायदा होईल, या हेतूने हे प्रवाशांसाठी हे खास तयार केले आहे. BOB Financial Solutions Limited (BFSL) ही बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) च्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

IRCTC BoB RuPay क्रेडिट कार्डचे फायदे:

Advertisement

▪️ IRCTC BoB RuPay Credit Card जेसीबी नेटवर्कद्वारे जगभरातील व्यापारी व ATM मध्ये व्यवहार करण्यासाठी वापरू शकता.

▪️ आयआरसीटीसी वेबसाईट (IRCTC Website) किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे (Mobile App) या क्रेडिट कार्डने 1AC, 2AC, 3AC, CC, EC बुकिंग करणार्‍या वापरकर्त्यांना 40 रिवॉर्ड पॉईंट्स (Per Rs 100 spent) मिळतील.

Advertisement

▪️ हे कार्ड (IRCTC Credit Card ) सर्व रेल्वे तिकीट बुकिंगवर 1% व्यवहार शुल्क माफ देखील केले जाते.

▪️ ग्राहक या क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर इंधन, किराणा सामान तसेच इतर गोष्टींसाठी करू शकतात. याला तुम्ही डिस्काउंट सुद्धा समजू शकता.

Advertisement

▪️ क्रेडिट कार्ड जारी केल्याच्या 45 दिवसांच्या आत 1,000 रुपये किंवा त्याहून जास्त सिंगल खरेदी करणार्‍यांना 1,000 बोनस रिवॉर्ड पॉईंट देखील मिळणार आहेत.

▪️ यासोबतच हे कार्ड वापरून, तुम्हाला किराणा (Grocery Shop), डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये प्रत्येक 100 रुपये खर्चासाठी 4 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील आणि इतर श्रेणींमध्ये दोन रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील.

Advertisement

▪️ क्रेडिट कार्डधारक दरवर्षी रेल्वे लाऊंजला चार वेळा मोफत भेट देऊ शकतील. याद्वारे, ग्राहकांना भारतातील सर्व पेट्रोल पंपांवर एक टक्के इंधन अधिभार माफी देखील मिळेल.

▪️ कार्डधारक, त्यांचा लॉयल्टी क्रमांक (को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर छापलेला) त्यांच्या IRCTC लॉगिन आयडीशी लिंक केल्यानंतर, IRCTC App आणि वेबसाइटवर मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट रिडीम करू शकतात.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement