SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दोन हजार रुपयांची नोट बाजारातून गायब, समोर आले ‘हे’ मोठे कारण..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद (Demonitisation) करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर काही दिवसांतच नागरिकांच्या हातात नव्या रंगात, नव्या आकारात 500 व 2000 हजार रुपयांच्या नोटा दिसू लागल्या.. गुलाबी रंगातील 2000 रुपयांच्या नोट तर एकदम आकर्षक स्वरुपात समोर आली..

मात्र, गेल्या काही दिवसांत तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल. ती म्हणजे, पूर्वी सर्रास दिसली जाणारी ही कलरफूल 2000 रुपयांची नोट कुठेतरी गायब झालीय.. म्हणजे, सहजासहजी ती आता दिसतच नाही.. एटीएम वा बॅंकांमधूनही ती फार कमी प्रमाणात नागरिकांना दिली जाते.. ही नोट बंद तर झाली नाही ना.. असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण तसे नाही..!

Advertisement

बाजारातून 2000 रुपयांची ही नोट गायब होण्यामागील कारण आता समोर आले आहे.. म्हणजे, खुद्द केंद्र सरकारनेच याबाबत लोकसभेत माहिती दिलीय.. त्यानुसार, 2020 व 2021 या आर्थिक वर्षात 2 हजारांची नवी नोटच छापलेली नसल्याचे सरकारकडून लोकसभेत सांगण्यात आले..

2019 मध्ये एक लाख रुपयांमागे 2 हजारांच्या नोटांची संख्या 32910 रुपये होती. मार्च-2021 पर्यंत हे प्रमाण 24,510 रुपयांपर्यंत कमी झाले. तसेच, 30 लाख कोटी रुपयांच्या एकूण चलनात 2 हजारांच्या नोटांचे मूल्य 2019 मध्ये 6 लाख 58 हजार कोटी होते. एका वर्षानंतर म्हणजे, 2020 मध्ये तेच मूल्य 4 लाख 90 हजार कोटींवर आल्याचे रिझर्व्ह बॅंकेची आकडेवारी सांगते.

Advertisement

देशात 31 मार्च 2020 रोजी चलनात असलेल्या एकूण पैशांमध्ये 2000 आणि 500 ​​रुपयांच्या 85 टक्के नोटा होत्या. उर्वरित 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा होत्या. ही आकडेवारी पाहिल्यास, सध्या चलनात 500 व 100 रुपयांच्या नोटांची संख्या वाढल्याचे स्पष्ट दिसते..

एटीएममधून 2000 रुपयांची नोट गायब
सध्या एटीएममधूनही 2000 रुपयांच्या नोटा मिळत नाहीत. ‘एटीएम’मध्येही 2000 च्या नोटांच्या बॉक्सऐवजी 500 रुपयांच्या नोटांचे बॉक्स ठेवले जात आहेत. एटीएममध्ये नोटा टाकणाऱ्या कंपन्यांनाच 2 हजारांच्या नोटा कमी दिल्या जात आहेत. शिवाय, बाजारात 2000 रुपये सुट्टे करतानाही नागरिकांना अडचणी येतात.. लोकांची अडचण लक्षात घेऊनच एटीएम व बँकेतून फक्त 500 रुपयांच्या नोटाच दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement