SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): अचानक उद्भवणाऱ्या खर्चावर आळा घालावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. तुमची आध्यात्मिक बाबींमध्येही आवड निर्माण होऊ शकते. परदेश व्यापारातून लाभ होईल. गोड बोलून कामे करून घ्याल. वाहन विषयक कामे निघतील. तुम्हाला वर्गमित्रांचे सहकार्य मिळेल त्यांना विसरू नका.

वृषभ (Taurus): कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. आज तुमच्यामध्ये आत्मविश्वास पुरेपूर असेल ज्यामुळे जलद गतीने कार्यक्षेत्रातील प्रत्येल काम तुम्ही पूर्ण करू शकता. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल, ते स्वीकारा.

मिथुन (Gemini) : घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला पैसे मिळू शकतात. या राशीचे दुकानदार आज कठोर परिश्रम करताना दिसतात. कौटुंबिक जीवनात संतुलन राहील, भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. साठवलेली संपत्ती वाढू शकते किंवा जाऊ शकते.

Advertisementकर्क (Cancer) : उगाच रागराग करू नका, नाहीतर तोटा होईल. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. या राशीच्या काही लोकांना वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकेल. कामातील उत्साह वाढेल.

सिंह (Leo) : कामातील अपेक्षितता वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक जीवनात संमिश्र परिणाम मिळतील, आज तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पुढे याल. सोने वगैरे मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही तुमचा व्यवसाय मित्रासोबत सुरू करू शकता.

कन्या (Virgo) : उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. धन वृद्धीचे योग जुळून येतील. वरिष्ठांशी मतभेद झाले असतील तर तेही आज मिटू शकतात. मालमत्तेत वाढ होऊ शकते. काही लोक या दिवशी नवीन विषयांचा अभ्यास करू शकतात. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आज घरी निवांत बसाल.

Advertisementतुळ (Libra) : घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल. चंचलता दूर करण्यासाठी योगसाधना करावी. व्यावसायिकांनी व्यवहार करताना काळजी घ्यावी. सांसारिक सौख्यात वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल. या राशीच्या काही लोकांना या दिवशी घरगुती वस्तूंवर,दुसऱ्यांवर पैसे खर्च करावे लागू शकतात.

वृश्‍चिक (Scorpio) : बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आयात-निर्यात व्यवसाय केल्यास नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. आज तुम्हाला तुमच्या खास मित्रांची आठवण होईल. एखाद्या प्रतिष्ठानमध्ये मदत करण्याची संधी मिळेल.

धनु (Sagittarius) : झोपेची तक्रार जाणवेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तारतम्य बाळगवे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.विवाहित महिलांना जोडीदाराकडून कपडे व इतर भेटवस्तू मिळू शकते. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल. अनाथालयात जाऊन याल.

Advertisementमकर (Capricorn) : खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल. आर्थिकदृष्ट्याही आजचा दिवस आनंददायी ठरू शकतो. संचित संपत्ती वाढेल. तुमच्या शब्दांची जादू तुम्ही सामाजिक स्तरावर पसरवू शकता. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील.

कुंभ (Aquarious) : भागीदारीत व्यवसाय करणारे या राशीचे लोक आज काही कारणाने त्रासलेले दिसू शकतात. प्रेम जीवनामध्ये चांगले बदल होतील, जोडीदार आज तुमच्यासोबत फिरायला जायची करण्याची मागणी करू शकतात. जर तुम्ही खेळात भाग घेणार असाल तर आज तुम्हाला विजय मिळू शकतो.

मीन (Pisces) : एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मित्राचा सल्ला घ्याल. मुलाच्या आरोग्याबाबत चिंता असू शकते. सूर्यास्तानंतर या राशीचे काही लोक जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवू शकतात. मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल. सारासार विचार करावा.

Advertisement