SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सुरेश रैनाची वापसी? आता आयपीएलमधील ‘या’ दिग्गज टीमचा होऊ शकतो भाग..

टीम इंडियाची नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका झाली आहे. काही दिवसांपूर्वी IPL 2022 साठी लिलाव पार पडला. या मेगा लिलावात अनेक गोष्टी अशा पाहायला मिळाल्या की, बऱ्याच दिग्गज खेळाडूंवर बोली लावली नाही तर काही अनकॅप्ड खेळाडूंवर बोली लावून कोटी रुपयांची उधळण झाली.

आयपीएलच्या 2022 साठी लिलावात त्या अनेक दिग्गज खेळाडूंमध्ये आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या Mr. IPL म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनावर (Suresh Raina) चक्क कोणत्याच फ्रॅंचायझीने बोलीदेखील लावली नाही. यामुळे अनेक फॅन्स नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. पण आता त्याची नवीन इनिंग सुरू होणार असल्याच्या चर्चा अनेक ठिकाणी पसरत आहेत.

Advertisement

सुरेश रैनाची नवीन इनिंग सुरू होणार?

आयसीसी टी-20 क्रमवारी जाहीर… तब्बल सहा वर्षानंतर टीम इंडियाने रचला इतिहास

मिस्टर आयपीएल म्हणून ओळख असलेल्या सुरेश रैनाला घेण्यात आयपीएलच्या लिलावात सीएसके (CSK) ने देखील यंदा कोणताही रस दाखवला नाही. दरम्यान ऑलराऊंडर सुरेश रैना देखील याबाबतीत भावनिक झाला. अनेक आयपीएल सिझनमध्ये आपल्या कामगिरीचा जलवा त्याने दाखवूनही सीएसकेच्या संघ निवड करणाऱ्यांनी सध्याच्या संघात तो फिट बसत नसल्याने इतर खेळाडूंना संधी देण्याचं कारण सांगितलं.

Advertisement

आता सुरेश रैना पुढे काय करणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे. दरम्यान BCCI कडे त्याने एक विनंती केल्याचंही समजतंय की, ‘आयपीएल नाही, पण इतर कशातही खेळण्याची संधी मिळावी, याबाबत चर्चा झाल्याचं ऐकायला येतंय. या खेळाडूला पुन्हा संधी देण्यात येणे, हे कोणत्याही संघासाठी सोनेच ठरणार आहे, हे आपण जाणतोच.

यासोबतच अशा चर्चा आहेत की, ‘सुरेश रैना आता आयपीएलमधील संघ आरसीबी (IPL Team RCB) सोबत जोडला (Suresh Rain new inning with RCB) जाऊ शकतो. पण तो खेळाडू म्हणून असेल की बॅटिंग कोच म्हणून की फिल्डिंग कोच याबाबत अधिकृत माहिती नाही. कारण कोणत्या भूमिकेत असेल हे अजून समोर आलेलं नाही. आरसीबी आणि सुरेश रैना यांच्या सध्या चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. आयपीएलचं मेगा ऑक्शन संपलं असलं तरी कोणत्या भूमिकेत त्याला फिट बसवावे यासाठी आरसीबी त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement