SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘शक्तिमान’ आता मोठ्या पडद्यावर येणार, ‘हा’ अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ची भूमिका..?

नव्वदच्या दशकात एका मालिकेने सगळ्यांनाच वेड लावलं होतं.. विशेषत: लहान मुले तर या मालिकेची आतुरतेने वाट पाहत असत.. ही मालिका म्हणजे, भारताचा पहिला वहिला सुपरहिरो.. अर्थात ‘शक्तिमान’.. अभिनेता मुकेश खन्ना यांनी साकारलेला ‘शक्तिमान’ आजही अनेकांच्या मनात कायम आहे.. मुकेश खन्ना यांची ही भूमिका घराघरात पोहोचली.

आता पुन्हा एकदा नव्या ढंगात, नव्या रंगात ‘शक्तिमान’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेही अगदी मोठ्या पडद्यावर.. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्राॅडक्शनतर्फे नुकताच ‘शक्तिमान’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.. प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत असून, त्यात ‘शक्तिमान’ची भूमिका कोण साकारणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे..

Advertisement

दरम्यान, मुकेश खन्ना यांनी नुकताच ‘शक्तिमान’ चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. त्यावेळी ते म्हणाले, की “आम्ही ‘शक्तिमान’ हा चित्रपट घेऊन येत आहोत.. खरं तर हे सांगण्यास मला उशीर झाला, कारण सोशल मीडियावर आधीच ही बातमी व्हायरल झालीय, तरीही माझं हे कर्तव्य आहे.. मी तुम्हाला दिलेले वचन पूर्ण केलंय. लवकरच ‘शक्तिमान’ चित्रपट येणार.”

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Sony Pictures IN (@sonypicturesin)

Advertisement

‘शक्तिमान’ची भूमिका कोण साकारणार, याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत मुकेश खन्ना यांच्यासोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता नकुल मेहता दिसत आहे. त्यामुळे नकुल मेहता हाच ‘शक्तिमान’ ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु आहे..

Advertisement

‘शक्तिमान’चा टिझर व्हायरल
सोनी पिक्चर्स इंडियाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘शक्तिमान’ चित्रपटाची झलक दाखवली आहे. व्हिडिओमध्ये मोठी उल्का पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचे दिसते. त्याच वेळी काळ्या पोशाखातील एक माणूस हवेत उडताना दिसत आहे. नंतर ‘शक्तीमान’ची झलक दिसते. त्यात ड्रेससह चष्मा नि कॅमेरा दिसत आहे. ‘भारतात नि जगभरातील अनेक सुपरहिरोच्या यशानंतर आता ‘देसी सुपरहिरो’ची वेळ आलीय..’ असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement