ठिबक सिंचन म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते ‘थेंब थेंब झिरपणारं पाणी’ नाही का? तसा खूपच कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबक संचाचा खर्च सुरुवातीला परवडत नसला तरी येणाऱ्या उत्पन्नात वाढ होत असल्याने या सिंचन पद्धतीचा वापर आजकाल वाढताना दिसतोय. हळूहळू का होईना पण अनेक रोग, किडींचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा कमी होतो. यासंह अनेक फायदे होतात.
ठिबक सिंचनाचे फायदे किती?
▪️ ठिबकच्या वापरामुळे पाणी वाया जात नाही. ठिबकद्वारे पिकांना गरजेप्रमाणे व योग्य वेळी पाहिजे तेवढेच पाणी दिले जाते.
रशिया युक्रेनमधील युद्धाचे काळे ढग दाटले; रशियाने घेतला मोठा निर्णय
▪️ पिकांना पारंपरिक पद्धतीने पाणी देण्यापेक्षा ठिबकद्वारे 40 ते 50 टक्के पाण्याची बचत होते.
▪️ दंडाने पाणी देण्याऐवजी ठिबक संचामुळे दुप्पट क्षेत्र पाण्याखाली आणता येते.
▪️ विहिरीला पुरेसे पाणी असले तरी विजेच्या अनियमततेमुळे दिवसा तर सोडाच कधीकधी तर रात्रीपण पाणी देणं शक्य होत नाही. ठिबक सिंचन पद्धतीमुळे शेतकरी रात्रीसुद्धा फक्त व्हॉल्व सुरू करून पिकांना ओलिताखाली आणू शकतो.
▪️ पिकांच्या उत्पादनात सरासरी 20 ते 30 टक्के वाढ होऊ शकते.
▪️ वेळेवर व योग्य पाणी मिळाल्यामुळे पिकांचा दर्जा वाढतो. ठिबकद्वारे पाण्यात विरघळू शकणारी खते पिकांना देता येतात, म्हणून पीक जोमदार येते.
▪️ पिकांचा पक्व होण्याचा कालावधी कमी होऊन कमी कालावधीत पीक तयार होते व काढता येते.
▪️ पारंपरिक पद्धतीने पाणी द्यायचं असलं की, जमिनीचे सपाटीकरण करून दंडातून पाणी दिलं तरी पिकांपर्यंत पोचत नाही. पण, ठिबकमुळे जमीन सपाट करण्याची गरज पडत नाही आणि हा खर्च वाचतो.
▪️ चढउताराच्या जमिनीवर फळझाडे लावता येतात.
▪️ खते हाताने दिल्याच्या तुलनेत ठिबकद्वारे दिल्यास 30-35 टक्के बचत होते. मजुराच्या खर्चात मोठी बचत होते.
▪️ ठिबकद्वारे पाणी फक्त झाडाच्या बुंध्यापर्यंत पोचते. मग जमीन पूर्ण ओली होत नाही, यामुळे गाजरगवत, काँग्रेस गवत वाढत नाही. पिकांवरील रोगासह किडींचा प्रादुर्भाव कमी होऊन जमिनीचे आरोग्य चांगले राहते.
▪️ ठिबकद्वारे कितीही क्षेत्र पाण्याखाली भिजवता येते
ठिबक सिंचन एकटा शेतकरी करू शकतो. परिणामतः मजुरांचा खर्च वाचविता येतो.
▪️ ठिबकद्वारे पाणी दिल्यामुळे जमिनी खारवट किंवा चोपण होत नाहीत.
▪️ विशेषतः हरितगृहातील नाजूक पिके, फुलांसाठी ठिबक अतिशय फायदेशीर ठरत आहे आणि उत्पादनही वाढत आहे.
(ठिबक संच वापरताना तांत्रिक माहिती असलेल्या प्रशिक्षित व्यक्तीकडून किंवा अनुभवी शेतकऱ्यांकडून संच चालविण्यासाठी व निगा कशी राखावी, याची माहिती घ्या.)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit