SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला माहितेय का? एटीएम कार्डचा पिन चार अंकी का असतो, मग वाचा रंजक गोष्ट..

माणसाचं जीवन आजकाल तंत्रज्ञान, बँकिंग, लाइफस्टाईल, ई-कॉमर्स वर जास्त खर्च होताना दिसतंय, त्याचं कारणही तसंच आहे, आपल्याला ऑनलाईन घरबसल्या मिळणाऱ्या सेवा हेच आहे. यामुळे आपल्या आयुष्यात या गोष्टींचं महत्व आणखी वाढलं आहे आणि पुढेही वाढतच राहणार आहे. सध्या ते पूर्वीपेक्षा सोयीस्कर झालं आहे.

आपल्याला काही वर्षांपूर्वी लागलेला एटीएमचा ( ATM ) शोध आज पैसे काढण्यासाठी (Money Withdrawal From ATM) उपयोगी येतो. बँकेतील (Bank) भल्यामोठ्या लांब रांगामध्ये उभं राहण्याऐवजी आज पैशांसाठी वाट पाहण्याचा त्रास संपला आणि आपल्याला बँकेच्या एटीएम मधून पैसे काढू शकतो. त्यामुळे बँकेत जाऊन पैसे काढण्यासाठी लागणारा आपला वेळही खर्च होत नाही. पण तुमच्या लक्षात कधी आलं आहे का, एटीएममधून पैसे काढताना तुमच्या डेबिट कार्ड (Debit Card) चा चार अंकी पिन (Why ATM has 4 digit long pin) मशीनवर टाकावा लागतो.

Advertisement

एटीएमचा पिन आणि रंजक गोष्ट..

दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; पाहा संपूर्ण पुरस्कार विजेत्यांची यादी!

आपल्याला दैनंदिन आवश्यक असणाऱ्या बँकिंग क्षेत्रातील एक यशस्वी शोध म्हणजे एटीएम मशीन. ATM Machine चा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरॉन (John Shepherd-Barron) यांनी लावला. विशेष गोष्ट ही की, या शास्त्रज्ञाचा जन्म भारतातच शिलाँग शहरात झाला होता. त्यांनीच 1969 साली एटीएम शोधून काढलं, व ते जगभर लोकप्रिय झालं.

Advertisement

दरम्यान, एटीएमचा पिन म्हणून 4 अंकी क्रमांक असतो तो शेफर्ड यांनी एटीएम मशीन तयार करून त्यात कोडिंग करून सिस्टिम बसवली, तेव्हा त्यांनी पिन क्रमांक फक्त 4 अंकी ठेवला पण का ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच, तर जाणून घ्या..

शेफर्ड यांनी सुरुवातीला एटीएम पिन 4 अंकांचा असावा, असा कोणताही प्लान केला नव्हता, उलट त्यांना तो 6 अंकी ठेवायचा होता. पण त्यांची पत्नी कॅरोलिनवर हा प्रयोग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तेव्हा पुन्हा पुन्हा ती 6 अंकांपैकी 2 अंक विसरायची. तिला फक्त 4 अंक आठवत असल्याने शेफर्ड यांनी अंदाज लावला की, माणसाचा मेंदू सहजपणे 6 ऐवजी 4 अंक लक्षात ठेवू शकतो, मग त्यांनी पुन्हा शक्कल लढवत एटीएम पिन चार अंकी ठेवला.

Advertisement

4 अंकी पिन अधिक सुरक्षित..?

शेफर्ड यांनी बदल करत एटीएमचा पिन 4 अंकी ठेवला असला तरी 6 अंकी ATM Pin ठेवण्यामागचा त्यांचा उद्देश हा होता की तो अधिक सुरक्षित राहावा. 4 अंकी एटीएम पिन 0000 ते 9999 या दरम्यानचा असतो. म्हणजे याचाच अर्थ असा की, कोणत्याही एटीएमचा पिन हा 10000 भिन्न पिन नंबरपैकी एकच ठेवता येतो, ज्यामध्ये 20 टक्के पिन हॅक केले जाऊ शकतात. अर्थात 4 अंकी पिन सहजरित्या हॅक केला जाऊ शकत नसला, तरी तो 6 अंकी पिन पेक्षा कमी सुरक्षित आहे. काही देशांमध्ये आजही 6 अंकी एटीएम पिन वापरला जातो. एटीएम मशीनचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement