SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): अचानक खर्च समोर येऊ शकतात. मानसिक त्रास टाळावा. आपल्या मतावर ठाम राहावे. घेतलेले कर्ज फेडणे कठीण होईल. जुन्या मित्रांची साथ मिळेल आणि चांगले मित्रही वाढतील. वरिष्ठांशी मतभेद होईल. मात्र वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या. प्रवासाचे नियोजन नीट करा.

वृषभ (Taurus): आज अधिक वेळ घरात काढाल. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी. आज तुम्हाला पत्नीकडून चांगले सहकार्य मिळेल. रात्र आनंदात घालवली जाईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवा. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. मोठ्या उलाढाली होतील.

मिथुन (Gemini) : आज उधारी घेणे टाळावे. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल. तुमच्या निर्णय क्षमतेचा आज तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. संध्याकाळी काही शुभ समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवासात दगदग होईल.

Advertisementकर्क (Cancer) : तुमचा व्यवहार शालीन राहील. गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. आवडणाऱ्या गोष्टींकडेच दुर्लक्ष होईल. जर तुम्हाला एखाद्या कामात देवाणघेवाण करायची असेल तर ते खुलेपणाने करा, तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा नंतर मिळेल. कागदोपत्री पूर्तता करण्यास वेळ द्या. घरातील कामांचा आढावा घ्या. सावधगिरी बाळगा.

सिंह (Leo) : वाहन विषयक कामे पार पडतील. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल. शारीरिक आजाराने त्रस्त असाल तर आज त्रास वाढू शकतो. सामाजिक कार्यात व्यत्यय येईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक आवक उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत अनुकूल बदल होतील.

कन्या (Virgo) : आज चांगला धनलाभ होईल. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. काही आकस्मिक लाभामुळे तुमची धर्म आणि अध्यात्मात रुची वाढेल. मुलाकडून आनंदाची बातमी मिळेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. प्रेमाची कबुली देण्यास हरकत नाही. दुसऱ्यांच्यासाठी झटावे लागेल.

Advertisementतुळ (Libra) : जोडीदाराला खुश कराल. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत गाणी-संगीताची आवड वाढेल. आईकडून प्रेम आणि विशेष सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. चांगला उपक्रम राबविला जाईल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. काहींची नवीन प्रकल्पासाठी निवड होईल.

वृश्‍चिक (Scorpio) : भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. जवळचे मित्र भेटतील. आज तुम्ही तुमच्या गौरवासाठी पैसा खर्च कराल, त्यामुळे तुमचे शत्रू नाराज होतील. आज पालकांची विशेष काळजी घ्या. घरातील नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. कामानिमित धावपळ करावी लागेल.

धनु (Sagittarius) : जोडीदारासमवेत वेळ मजेत घालवाल. लहान व्यावसायिकांना चांगला नफा कमावता येईल. अकल्पनीय आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे. आज सासरच्या मंडळींकडून नाराजीचे संकेत मिळतील, मधुर आवाजाचा वापर करा. तरुण-तरुणींचा विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील.

Advertisementमकर (Capricorn) : तुमच्या ओळखीत वाढ होईल. सर्वांशी आपुलकीने वागाल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल. नात्यात कटुता येईल. डोळ्यांशी संबंधित काही समस्या असल्यास त्यात सुधारणा होणार आहे. चांगल्या लोकांच्या सहवासात याल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. भावंडांची भेट होईल.

कुंभ (Aquarious) : डोकेदुखीचा त्रास जाणवेल. आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. नोकरीत व्यस्त राहाल. मुलांना यश मिळेल. इतरांच्या भांडणात पडू नका. व्यवसायात विक्री चांगली राहील. घरी पाहुणे येतील. मालमतेच्या कामात यश मिळेल. बायको आपल्याला सांभाळून घेईल.

मीन (Pisces) : आशिर्वाद आणि पाठिंबा मिळेल. शरीराच्या दुखण्यामुळे पत्नी दुःखी राहू शकते. व्यर्थ खर्चाचे योगही आहेत. तुम्ही मनापासून लोकांचा चांगला विचार कराल. विविध कामे मार्गी लागतील. कामात उत्साह राहील. उत्साहाच्या भरात कुणाचा अपमान होईल असे बोलू नका. जोडीदार आपल्याला चांगली साथ देईल.

Advertisement