SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: सोन्याचा भाव गेला 50 हजार पार, जाणून घ्या सोने-चांदीचे आजचे दर..

जगात काही आंतराष्ट्रीय घडामोडींमुळे, आर्थिक कारणांमुळे आणि सध्या कोरोनामुळे सोने (Gold Rate Today) आणि चांदीचे (Silver Rate Today) भाव दररोज बदलत असतात. सोन्याच्या दरात होणाऱ्या या चढ-उतारामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर त्याची किंमत तब्बल 50 हजार रुपयांच्याही पुढे गेली आहे. आता यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

आज सोमवारी (दि. 21 फेब्रुवारी) मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.01 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत असून चांदीच्या दरात 0.38 टक्क्यांची घसरण झाली असल्याचं पाहायला मिळालं.

Advertisement

गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार 10 ग्रॅम सोन्याचे दर:

▪️ मुंबई -22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,990 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,180 रुपये

Advertisement

▪️ पुणे – 22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,140 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,240 रुपये

▪️ नागपूर – 22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,990 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,180 रुपये

Advertisement

एप्रिल डिलिव्हरी असलेल्या सोन्याची किंमत 0.01 टक्क्यांच्या तेजीसह 50,180 रुपये प्रति 10 ग्राम आणि चांदीची किंमत 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 63,659 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

आज चांदी 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 63,659 रुपये प्रति किलोग्रॅम ट्रेंड करत आहे. साथीच्या आजाराची भीती, महागाईची चिंता, रशिया युक्रेन आणि मजबूत अमेरिकन डॉलर यांच्यातील सततचा तणाव यामुळे सोन्याचे भाव 2022 मध्ये 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीच्या वर जाण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. महागाईचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे भाव वाढतील अशी शक्यता आहे.

Advertisement

(सूचना : सदर सोने आणि चांदीचे दर हे ऑनलाईन आहेत, हे दर अनेक वेळा बदलत असतात. अचूक भाव पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement