SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ड्रायव्हिंग लायसन्स’च्या ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ, रजिस्ट्रेशन न केल्यास बसणार मोठा फटका..!

वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. वाहनचालकांना आता त्यांचे जूने ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ अर्थात वाहन चालक परवान्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. परिवहन विभागाने देशातील सर्व जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांना (DTO) याबाबत महत्वाची सूचना दिल्या आहेत..

देशातील सर्व प्रकारच्या वाहन चालकांना त्यांचे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चे (Driving Licence) ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानुसार आतापर्यंत अनेक चालकांनी त्यांचा परवान्यांची नोंदणी केलेली आहे. मात्र, अजूनही अनेक चालकांनी ही नोंदणी केलेली नाही. अशा चालकांसाठी परिवहन विभागाने आणखी एक संधी दिली आहे.

Advertisement

कधीपर्यंत दिली मुदतवाढ..?
परिवहन विभागाच्या सूचनेनुसार, आता 12 मार्चपर्यंत सर्व चालकांना त्यांचे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ ऑनलाईन रजिस्टर करावे लागणार आहे. आता या नोंदणीसाठी फार कमी दिवसांची मुदत राहिली असून, यापुढे मुदतवाढ देणार नसल्याचा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. त्यामुळे लवकरात लवकर ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ ऑनलाईन रजिस्टर करुन घ्यावे लागणार आहे.

चालकाने आता जर जुन्या ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ची ऑनलाइन नोंदणी केली नाही, तर भविष्यात त्याला ‘आरटीओ’च्या (RTO) चकरा मारण्याची वेळ येऊ शकते.. परिवहन विभागाकडून परवानाधारकांना ही अखेरची संधी दिली आहे.

Advertisement

हस्तलिखित ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ लवकरात लवकर ऑनलाईन करण्याच्या सूचना परिवहन विभागाने देशातील सर्व जिल्ह्यांच्या परिवहन अधिकाऱ्यांना (डीटीओं) दिल्या आहेत.. भारत सरकारच्या ‘सारथी’ वेब पोर्टलवर 12 मार्चनंतर बॅकलॉग एंट्रीची तरतूद बंद केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे..

‘ड्रायव्हिंग लायसन्स’ची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर परिवहन विभागाकडून नव्याने हे परवाने जारी केले जाणार आहेत. चालकांनी 12 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत मूळ ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ घेऊन परिवहन कार्यालयात यावे लागणार आहे. तसे आदेश सर्व ‘आरटीओं’ना देण्यात आले आहेत.

Advertisement

चालकांना हस्तलिखित ‘लायसन्स’ ठेवताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता हे ‘लायसन्स’ डिजिटल होणार असून, अवघ्या काही मिनिटांत ऑनलाइन पोर्टलवर चालकाची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार असल्याचे परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले.. दरम्यान, आता तुम्हाला तुमचे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ आधार क्रमांकाशी लिंक करावे लागणार आहे.

असा होणार फायदा..!
प्रवासादरम्यान तुमचे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ हरवले किंवा चोरीला गेल्यास नवीन लायसन्स मिळवताना चालकाच्या नाकीनव येत होते. परंतु, आता काही मिनिटांत ऑनलाईन पोर्टलवर तुमचे ‘लायसन्स’ काढता येणार आहे. शिवाय, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्येही हे लायसन्स सेव्ह करुन ठेवता येणार आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement